Homemade Chutney : तोंडी लावायला काहीच नाहीये? मग ५ मिनिटांत बनवा ही चटपटीत चटणी; दोन चपाती जास्तच खाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टॉमेटो अन् कोथिंबीरीची चटणी

टॉमेटो अन् कोथिंबीरीची चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. अनेक घरांमध्ये ही चटणी बनवली जाते.

Tomato Coriander Chutney | GOOGLE

फायदेशीर

टॉमेटो अन् कोथिंबीरीची चटणी शरीरीला फायदेशीर असते. या चटीचे सेवन केल्यास पोटासंबंधीत समस्या दूर होतात आणि भूक देखील वाढते.

Benefits | GOOGLE

चटपटीत चटणी

जर तुम्हाला टॉमेटो आणि कोथिंबीरीची चटणी खायची असेल तर, ती कशी बनवायची ते जाणून घ्या.

Green coriander | yandex

साहित्य

चटणी बनवण्यासाठी तुम्हाला टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची , लसूण आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Green Chili | GOOGLE

टॉमेटो कापून घेणे

टॉमेटो स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर टॉमेटोचे मोठे तुकडे करुन घ्या.

Tomato | GOOGLE

कोथिंबीर

हिरवी कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून बारिक कापून घ्या. त्याचबरोबर हिरवी मिरची देखील कापून घ्या.

Coriander | GOOGLE

लसूण

लसणाच्या २ ते ३ पाकळ्या घ्या. पाकळ्या सोला आणि कापून घ्या.

Garlic | GOOGLE

वाटून घ्या

मिक्सरमध्ये सगळ्या गोष्टी टाका. वरुन स्वादानुसार मीठ टाका. आता चटणी बारीक वाटून घ्या. तुम्हाला हवे असल्यास मसाला देखील टाकू शकता.

Mixer | GOOGLE

चटणी तयार

तुमची चटपटीत चटणी तयार आहे. जेवताना तोंडी लावायला चपाती, भाकरी किंवा वरण भातासोबत सर्व्ह करु शकता.

Chutney | GOOGLE

Amla Thecha : चपातीसोबत खायला घरीच ठेचा, लगेच नोट करा रेसिपी बनवा झणझणीत आवळा

Amla Thecha | GOOGLE
येथे क्लिक करा