Shivaji Sawants BJP Joining Put on Hold Saam
महाराष्ट्र

तानाजी सावंत यांच्या भावाचा भाजप प्रवेश रखडला; कौटुंबिक की राजकीय मतभेद? नेमकं कारण काय?

Shivaji Sawant’s BJP Joining Put on Hold: तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांचा भाजप पक्षप्रवेश रखडला. नेमकं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण.

Bhagyashree Kamble

  • शिवाजी सावंत यांचा भाजप पक्ष प्रवेश रखडला

  • सावंत यांच्यासोबत माजी नगरसेवकांचाही होणार होता पक्षप्रवेश

  • पक्षप्रवेश लांबणीवर

  • राजकीय चर्चांना उधाण

शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि सोलापुरातील माजी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा भाजपमध्ये होणारा पक्षप्रवेश रखडणार आहे. सावंत यांचा भाजपमध्ये होणारा अपेक्षित पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे. माजी मंत्री आणि भूम परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत हे शिवाजी सावंत यांचे बंधू आहेत. बुधवारी त्यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार होता. मात्र, अद्याप हा पक्ष प्रवेश सोहळा झाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून माजी मंत्री तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांच्यात कौटुंबिक तसेच राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. या मतभेदानंतर शिवाजी सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी सावंत हे भाजप पक्षातील नेत्यांच्या संपर्कात होते. अलिकडेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. बुधवारी भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबईत होणार होता. यासाठी सावंत यांनी सर्व तयारीही केली होती.

शिवाजी सावंत यांच्यासोबत कुर्डूवाडी, करमाळा आणि सोलापुरातील अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार होता, अशी माहिती आहे. मात्र, अंतिमक्षणी हा पक्षप्रवेश सोहळा लांबणीवर पडला. या घडामोडींमुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवादी सावंत यांचा भाजप पक्षात प्रवेश कधी होणार? असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंबेडकर अनुयायांनी रास्ता रोको का केला? काय नेमके कारणे? VIDEO

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! मेट्रो लोणी काळभोर आणि सासवडपर्यंत धावणार; कसा असणार प्लान?

Late Sleeping Risks: तरुणांनी सावध राहा! कमी वयात मृत्यूची शक्यता वाढवते उशिराची झोप, वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

पुणे - मुंबईदरम्यान धावणाऱ्या १७ ट्रेन्स रद्द, लोकलवरही होणार परिणाम, वाचा संपूर्ण लिस्ट

Sudan Civil War: निमलष्करी दलाचा एका अंगणवाडीवर ड्रोन हल्ला; ३३ मुलांसह ५० जण ठार

SCROLL FOR NEXT