Solapur Shocking  Saam tv
महाराष्ट्र

Solapur : सोलापुरात गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना; एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ

Solapur Shocking : सोलापुरात गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

सोलापुरात गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

मृतांमध्ये दोन लहान बहीण-भाऊ आणि त्यांच्या आजीचा समावेश

घरगुती एलपीजी गॅस गळतीमुळे गुदमरल्याचा प्राथमिक अंदाज

पोलिस आणि रुग्णवाहिका वेळेत पोहोचली

सोलापूर : सोलापुरात एका कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरात रविवारी गॅस गळतीमुळे ५ जणांचं कुटुंब घरात बेशुद्ध अवस्थेत आढळलं. पोलिसांना ही बाब कळताच कुटुंबातील सदस्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सोलापुरातील लष्कर भागात घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सोलापुरातील लष्कर भागातील धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरात काल एका घरात गॅस गळती झाली. गॅस गळतीमुळे घरात 5 जणांचं कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळलं. कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत गॅस गळतीमुळे श्वास गुदमरल्यामुळे चिमुकल्या बहिणभावासह आजीचाही मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

पाच जणांच्या या कुटुंबात शनिवारी माध्यरात्री घरगुती एलपीजी गॅस गळती झाल्यामुळे कुटुंबातील पाचही लोक अंत्यवस्थ होते. एलपीजी गॅसमुळे या कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढलं. त्यामुळे त्यांचं फुफ्फुस निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. आम्ही त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. मात्र यातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक जण अंत्यवस्थ आहे, असेही डॉक्टरांनी सांगितलं.

हर्ष बलरामवाले (6), अक्षरा बलरामवाले (4), विमल मोहनसिंग बलरामवाले (60) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर युवराज मोहनसिंग बलरामवाले (वय 40), रंजना युवराज बलरामवाले (35) यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास सदर बाजार पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, घरातील एलपीजी गॅस गळतीमुळे गुदमरून कुटुंब बेशुद्ध झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सोलापूरच्या लष्कर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: असं रुपडं देखणं त्याला सुर्याचं रे दान...

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ नाराज नाहीत, त्यांच्या मनातील शंका दूर करू - मुख्यमंत्री फडणवीस

Public Holiday 2025 : ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे की नाही? महत्वाची माहिती आली समोर

आधी मंदिरात लग्न नंतर जंगलात बलात्कार; ६० वर्षीय वृद्धाचं १५ वर्षीय मुलीसोबत हैवानी कृत्य

GST गिफ्टसाठी दिवाळीऐवजी नवरात्रीचा मुहूर्त साधला, मोदी सरकारचा नेमका मास्टरप्लॅन काय?

SCROLL FOR NEXT