Solapur's Karnik Nagar: The area where a tragic sibling suicide case has shaken the community. Both victims used the same scarf and left a note behind. Saam TV News
महाराष्ट्र

Solapur: एकाच स्कार्फने दोघांनी आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत नात्याचा उलगडा; सोलापूरात खळबळ

Youth and Girl ends life: सोलापूरातील कर्णिक नगरमध्ये तरुण-तरुणीनं एकाच स्कार्फने गळफास घेत आत्महत्या केली. चिठ्ठीत 'आम्ही भाऊ-बहीण आहोत' असा उल्लेख करून आयुष्य संपवलं.

Bhagyashree Kamble

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

एकाच स्कार्फचा वापर करून युवक आणि युवतीने आत्महत्या केली आहे. सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातून ही धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी भाऊ बहीण असल्याचा उल्लेख आहे. मात्र, दोघांमध्ये नेमकं काय नातं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मृत युवकाचे नाव रोहित ठणकेदार असून, तो चालक म्हणून काम करत होता. युवतीचे नाव अश्विनी केशापुरे असून, तिने बी. फार्मसीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. नातेवाईकांच्या माहितीनुसार, रोहितने अश्विनीला मानलेली बहीण मानले होते.

सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील एका बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मृतदेह सापडला. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. मृतदेहाच्या शेजारी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये युवक आणि युवतीने आपल्या नात्याचा उलगडा केला आहे. 'आम्ही दोघे भाऊ-बहीण आहोत, आम्ही एकमेकांसोबत शेवटपर्यंत आहोत. आमच्या मृत्यूनंतर आमच्या नात्यावर कुणीही शंका घेऊ नका', असं त्यात लिहिलेलं होतं.

दोघांनीही आत्महत्येच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर 'भाऊ-बहीण' असल्याचा उल्लेख करत स्टेटस टाकल्याचे उघड झाले आहे.घटनेनंतर नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जोरदार आक्रोश केला. या प्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं? याचा सखोल तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT