Sangola Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Sangola Vidhan Sabha : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्षांची सांगोल्यातून अपक्ष उमेदवारी; आमदार शहाजी बापू पाटील यांना धक्का VIDEO

भारत नागणे

पंढरपूर : सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सहकारी व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी आज जनता हाच आपला पक्ष; असे सांगत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. इतकेच नाही तर त्यांनी राष्ट्रवादीचे असलेल्या सर्व पदांचा देखील राजीनामा दिला आहे. साळुंखे पाटील यांच्या उमेदवारीमुळे आमदार शहाजी बापू पाटील अडचणीत आले आहेत.

दीपक साळुंखे पाटील हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. २०१९ च्या निवडणुकीमध्ये दीपक साळुंखे पाटील यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) यांना मदत केली होती. त्यांच्या मदतीमुळे शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या ७६८ इतक्या अल्पमताने विजय झाला होता. त्यांनी शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता. दरम्यान यंदा होत असलेल्या निवडणुकीसाठी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी आज अधिकृतपणे घोषणा केली आहे.  

शहाजी बापू व शेकापने आता मदत करावी 

मागील पाच वर्षांमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांना मदत केली आहे. त्यापूर्वी शेकापला चार वेळा मदत केली आहे. (Sangola) त्यामुळे आता शहाजी बापू पाटील व शेकापने यांनी आपल्याला मदत करावी असे आवाहनही साळुंखे पाटील यांनी केले आहे. सांगोल्यामध्ये शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशी दुहेरी लढत अपेक्षित असतानाच माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी महायुतीला मोठा धक्का देत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. साळुंखे यांच्या उमेदवारीमुळे सांगोल्याच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi Vadra : अखेर काँग्रेसने डाव टाकला; प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री, उमेदवारी जाहीर,VIDEO

Maharashtra News Live Updates: 225 बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट; आरोपीकडून दांडके आणि कपडे जप्त

Atul Parchure Last Video : अतुल परचुरेंची राज ठाकरेंसाठी अखेरची पोस्ट; एकेक शब्दात दिसत होती तळमळ, बघा VIDEO

Bomb Threat: चार विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती; एअर इंडियाचं विमान कॅनडात तर एअर इंडिया एक्सप्रेस उतरलं आयोध्येत

Post Office Saving Scheme : 115 महिन्यात पैसे होणार दुप्पट; पोस्ट ऑफिसची खास योजना, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT