Solapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime News: रीलस्टार अभिनेत्रीशी असभ्य वर्तन; माजी नगरसेवक पुत्राला पोलिसांकडून समज

Solapur News: आरोपींमध्ये माजी नगरसेवकांच्या मुलासह अन्य तीघांवर रीलस्टारने आरोप केले आहेत. आरोपींनी रीलस्टारबद्दल सोशल मीडियावर अश्लिल पोस्ट देखील शेअर केली होती.

Ruchika Jadhav

विश्वभूषण लिमये

Solapur News:

नवरात्रोत्सवात दांडिया फेस्टिव्हलला रीलस्टार अभिनेत्रीशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रीलस्टारने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत त्याला समज देऊन सोडून दिले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सोलापुरात नवरात्रोत्सवात २२ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर 'दुर्गाष्टमी दांडिया फेस्टिव्हल'चे आयोजन केले होते. २२ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमासाठी रीलस्टार अभिनेत्रीला बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात रीलस्टारचा विनभंग करण्याच्या उद्देशाने तिच्याशी अश्लील हावभाव करण्यात आले.

आरोपींमध्ये माजी नगरसेवकांच्या मुलासह अन्य तीघांवर रीलस्टारने आरोप केले आहेत. आरोपींनी तिच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लिल पोस्ट देखील शेअर केली होती, अशीही तक्रार पोलिसांत देण्यात आलीये. २६ ऑक्टोबर रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.

या घटनेनंतर कार्यक्रमासाठी आलेल्या रीलस्टार अभिनेत्रीने महिला आयोगाकडेही तक्रार केली. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाकडे पत्र प्राप्त झाले. पुढे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कारवाईचे आदेश बजावताच सदर बझार पोलिसांनी गुंगारा देणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन नोटीस बजावून पुन्हा असे कृत्य करणार नाही, अशी समज नोटिसीद्वारे देऊन सोडून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आज आपण श्वास घेतोय - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

SCROLL FOR NEXT