SOLAPUR ATM THEFT: THIEVES STEAL ENTIRE SBI ATM MACHINE IN DARING HEIST Saam tv
महाराष्ट्र

Solapur : सोलापुरात भल्या पहाटे दरोडा; चोरट्यांनी ATM मशीन पळवलं, संपूर्ण शहरात खळबळ

Solapur SBI Bank ATM Robbery Case : सोलापुरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत SBI चे संपूर्ण एटीएम मशीनच उखडून नेल्याची घटना समोर आली आहे. पहाटे ३ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • सोलापुरात चोरट्यांनी संपूर्ण SBI एटीएम मशीन चोरी केले

  • घटना पहाटे ३ वाजता सग्गम नगर परिसरात घडली

  • CCTV फुटेजच्या आधारे पोलिस तपास सुरू

  • चोरीतील रक्कम अद्याप स्पष्ट नाही

विश्ववभूषण लिमये, सोलापूर

सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरात चोरट्यांनी अत्यंत धाडसी पद्धतीने चोरी करत संपूर्ण एटीएम मशीनच उखडून नेली आहे. घरकुल परिसरातील सग्गम नगर भागात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एटीएम केंद्रावर ही चोरी झाली असून, त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मशीनमधील रोख रक्कम काढण्याचा प्रयत्न न करता थेट संपूर्ण एटीएम मशीनच उखडून वाहनात टाकले आणि तेथून पळ काढला. या प्रकारामुळे चोरट्यांनी आधीच रेकी करून तयारी केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांत सोलापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे.

आता थेट बँकेच्या एटीएमलाच लक्ष्य केल्याने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

त्याचबरोबर एसबीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरात नाकेबंदी केली आहे आणि तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. सदर एटीएममध्ये सुरक्षेसाठी आत दोन आणि बाहेर एक असे एकूण तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते. पोलिसांनी या कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त केले असून, त्याच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, चोरीला गेलेल्या एटीएम मशीनमध्ये नेमकी किती रोख रक्कम होती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. बँक प्रशासनाकडून कॅश ऑडिट सुरू असून, त्यानंतरच चोरीची अचूक रक्कम स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेचा निर्घृण खून; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला

चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी सोपी ट्रिक

Maharashtra News Live Update: नागपुरात अवैध कत्तलखान्यांविरोधात विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन ....

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लुटला स्कुबा डायव्हिंगचा आनंद; पाहा फोटो

Hai Jawani Toh Ishq Hona Hai: वरुण धवनचा 'है जवानी तो इश्क होना है' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT