Rajan Patil’s resignation gives a major political blow to Ajit Pawar after his switch to BJP. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Solapur Politics Rajan Patil: अजित पवार यांचे जवळचे सहकारी राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आता त्यांनी सहकार परिषदेच्या पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवलाय.

Bharat Jadhav

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मिळालं होतं सहकार परिषदेचे अध्यक्षपद

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा

  • भाजपत प्रवेश करताच राजन पाटलांचा मोठा निर्णय

नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटील यांनी अजित पवार यांना धक्का दिलाय. भाजपमध्ये जाताच पाटील यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिलाय. अजित पवार यांच्या पक्षाला घरघर लागल्याचं दिसत आहे. मंत्र्यांवरील आरोपानंतर आता नेत्यांचं आऊटगोइंग, यामुळे अजितदादांची चिंता वाढलीय.

महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या आणि मोठा भाऊ असणाऱ्या भाजपने सोलापूरमध्ये 'ऑपरेशन लोट्स' करत अजितदादांना जबर धक्का दिला. हे धक्के कमीच होते की, अजित पवार यांना राजन पाटील यांनी अजून एक धक्का दिला. राजन पाटील यांनी सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय.

माझा राजीनामा स्विकार करावा ही मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती केल्याचं पाटील यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळालंय. त्यामुळे मी माझा राजीनामा देत आहे, असं राजन पाटील यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान राजन पाटील हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षातील एक महत्त्वाचा माजी आमदार भाजपने आपल्याकडे ओढून घेतलाय.

निष्टेला महत्व नाही म्हणता मग...

काही दिवसापूर्वी राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपमध्ये प्रवेश करताना निष्ठेला महत्त्व नसल्यानं राष्ट्रवादी सोडत असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका केली होती. निष्टेला महत्व नाही म्हणता मग सहकार परिषदचे अध्यक्ष कसे झालात? असा सवालही उमेश पाटील यांनी टीका करताना केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: हॉटेलवर पोलिसांची धाड, घाबरूुून नग्नावस्थेत धावली तरुणी, पहिल्या मजल्यावरून खाली पडली अन्...

Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती बिघडली; उपचारासाठी पैसा नाही, रणबीरच्या बहिणीकडून मदतीचा हात

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० पूर्वी दुःखद घटना, तरुण क्रिकेटरचा बॉल लागून मृत्यू

Weight Loss Soup: वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी बनवा भाज्याचं सूप, आठवडाभरात पोटाची चरबी होईल कमी

Thane Ring Metro : २९ किमी लांब अन् २२ स्थानके; ठाणे रिंग मेट्रोच्या कामाचा मूहूर्त ठरला, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT