ऐन दिवाळीत भाजपमध्ये माजी आमदारांच्या प्रवेशावरून वाद पेटला आहे.
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने आणि इतर तीन आमदारांचा भाजप प्रवेश होणार आहे.
आगामी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद वाढले आहेत.
माजी आमदाराच्या भाजप प्रवेशावरून जिल्ह्यात राजकीय वादंग सुरू झालाय. राज्यासह देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांमधील प्रवेशांमुळे धमाका सुरू आहे. ऐनदिवाळीच्या मुहूर्तावर भाजपमध्ये जोरात इनकमिंग सुरू आहे. मात्र या इनकमिंगमुळे सोलापुरातील राजकारणात नाराजीचे फटाके फुटले आहेत.
भाजपमध्ये दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंसह चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र माजी आमदारांच्या प्रवेशावरून भाजपमधील इतर कार्यकर्ते नाराज झालेत. दरम्यान आगामी निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी माजी आमदारांचा प्रवेश करून घेतला जात आहे.
दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षप्रवेश होणार असल्याची कल्पना आम्हाला देण्यात आली नसल्याचं आमदार सुभाष देशमुख म्हणालेत. देशमुख यांच्या दाव्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी आमदाराच्या भाजप प्रवेशावर बोलताना देशमुख म्हणाले, इतरांना पक्षात घेणे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. या निर्णयामुळे पक्षाला मोठी हानी होऊ शकते.
दरम्यान भाजप कार्यालयासमोर दक्षिण सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून कार्यकर्ते आक्रमक होणे स्वाभाविक असं म्हणत सुभाष देशमुख यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसविण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी फोडाफोडीची मोठी खेळी खेळत आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा खेळ खेळला जात आहे.
मात्र ही फोडाफोडीचं राजकारण भाजपच्या अंगाशी येताना दिसत आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकतीच मुंबईत जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतलीय. त्या भेटीनंतर माजी आमदार राजन पाटील यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले. तर दिलीप माने यांनी दिवाळीनंतर आपला भाजप प्रवेश होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.