Sushilkumar SHinde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News : शिंदेच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय भूकंप; भाजपकडून ऑफरच्या दाव्याने भुवया उंचावल्या

Political News : मला आणि माझी मुलगी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपने येण्याची पक्षात येण्याची ऑफर दिली होती, असा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या राजकीय चर्चांदरम्यान माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा दावा केला आहे. मला आणि माझी मुलगी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपने येण्याची पक्षात येण्याची ऑफर दिली होती, असा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

भाजपने मला व माझ्या मुलीला पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असा खुलासाही सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने सोलापुरात राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधीत सोलापुरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. (latest marathi news)

भाजपची टीका

मात्र मुलगी परत निवडून येणार नाही असं वाटत असल्याने तिला भाजपमध्ये पाठवण्याची तयारी असेल, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुशीलकुमार शिंदे-चंद्रकांत पाटील यांची आज भेट

सुशीलकुमार शिंदे यांच्या गौप्यस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे चंद्रकांत पाटील हे सुशीलकुमार शिंदेच्या घरी जाणार आहेत. सुशीलकुमार शिंदेचा गौप्यस्फोट आणि चंद्रकांत पाटलांसोबत भेट यामुळे सोलापूरकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मात्र या दौऱ्याबाबत बोलताना शिंदे यांनी सांगितलं की, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज माझ्याकडे येत आहेत. त्यांनी जरी हा दौरा गुपित ठेवला असला तरी ते नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी येत असल्याचे मला माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT