काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची मुलगी यामिनी अय्यर यांच्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चवर केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठी कारवाई केलीय. यामिनी यांच्या नेतृत्त्वात चालणऱ्या प्रसिद्ध थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचं फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेगुलेशन अॅक्ट (FCRA)रद्द करण्यात आलं आहेही संस्था नियमांचे उल्लंघन करत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. (Latest News)
गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला आहे. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च हे यापूर्वीही सरकारच्या (Government) रडारवर होते. यापूर्वी या थिंक टँकवर आयकर सर्वेक्षण करण्यात आले होते. मार्च 2023 मध्ये, गृह मंत्रालयाने सीपीआरचा एफसीआरए परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित केला. त्यानंतर आता MHA च्या FCRA विभागाने त्याचा परवाना रद्द केला आहे.
मंत्रालयाने (Ministry) दिलेल्या माहितीनुसार, थिंक टँक सीपीआरला फोर्ड फाऊंडेशनसह अनेक परदेशी संस्थांकडून निधी मिळाला होता. थिंक टँकवर गुजरातमधील सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला देणगी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. गृह मंत्रालयाने २०२३ मध्ये कायद्यांचे उल्लंघन केल्यामुळे 'सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च' या अग्रगण्य थिंक टँकचा FCRA परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित केला होता.
यानंतर यामिनी अय्यर यांच्या संस्थेने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनानुसार, ते कायद्याचे पालन करत असून अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) सह सरकारी अधिका-यांकडून त्याची नियमितपणे तपासणी आणि ऑडिट देखील केले जाते. देशातील सर्व गैर सरकारी संस्थांना ज्यांना परदेशातून निधी मिळत आहे, त्यावर केंद्र सरकार कठोर कारवाई करत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.