Ram Mandir: राम मंदिराच्या फ्री VIP पासच्या नादात लागेल लाखोंचा चुना, तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय का?

Ram Mandir Inauguration: अयोद्धेत २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी २२ तारखेला अयोद्धेत न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचा फायदा घेत स्कॅमर्स भाविकांना फ्रॉड मेसेज पाठत आहेत.
Ram Mandir
Ram MandirSaam Tv
Published On

Ram Mandir Inauguration: Fraud Message of Free VIP Pass:

अयोद्धेत २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. अयोद्धेत होणाऱ्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापणेची वाट संपूर्ण देशभर पाहत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी २२ तारखेला अयोद्धेत न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही अनेकजण हा सोहळा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. मात्र, या भाविकांसोबत अनेक स्कॅम होत असल्याचे दिसत आहेत.

राममंदिराच्या उद्घाटनासाठी उत्सुक असलेल्या भाविकांसोबत अनेक सायबर फ्रॉड होताना दिसत आहे. राम मंदिराचा फ्री व्हिआयपी पास मिळवून देण्याचे आमिष भाविकांना देण्यात येत आहे. यासंदर्भातील मेसेज व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून खोट लिंक देऊन भाविकांची फसवणूक करत आहेत. (latest News)

काय आहे मेसेज?

व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये एका अॅपची लिंक देण्यात येत आहे. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यावर तुम्हाला राम मंदिराचा व्हिआयपी पास मिळत असल्याचा मेसेजमध्ये लिहलं आहेय मात्र, केंद्र सरकार किंवा कोणताही ट्रस्ट अशी कोणतीही ऑफर देत नाही. त्यामुळे या लिंकवर क्लिक करु नये, असे सांगण्यात येत आहे.

या लिंकमध्ये दिल्या जाणाऱ्या अ‍ॅपमधून कोणताही अ‍ॅप डाउनलोड करणे धोक्याचे ठरु शकते. यामुळे फोनमध्ये मालवेअर पाठवले जाऊ शकते. या अ‍ॅपच्या माध्यमातून फोनमध्ये व्हायरल देखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या फोनमधील सर्व डेटा स्कॅमर्सना मिळू शकतो.

Ram Mandir
Upcoming IPO List : कमाईची सुवर्णसंधी! 3 IPO मध्ये पैसे गुंतवून व्हा मालामाल

जर तुमच्या फोनचा अ‍ॅक्सेस स्कॅमर्सना मिळाला तर, तुमचे मेसेज, फोन कॉल्स, फोटो,क कॉन्टॅक्ट, यूपीऐय सर्वकाही सायबर फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींना मिळू शकते. तसेच तुमच्या फोनमधील पासवर्ड देखील स्कॅमर्संना करु शकतात. त्यामुळे या मेसेजवर क्लिक करु नये.

Ram Mandir
Gold Silver Rate (17th January 2024): सोन्याचा भाव ३८० रुपयांनी घसरला, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com