Upcoming IPO List : कमाईची सुवर्णसंधी! 3 IPO मध्ये पैसे गुंतवून व्हा मालामाल

IPO Hit Market : शेअर बाजारात गुंतवणूक करुन बपर कमाईची संधी तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या ३ IPO मध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता.
Upcoming IPO List
Upcoming IPO List Saam Tv
Published On

Best Investment IPO :

शेअर बाजारात गुंतवणूक करुन बपर कमाईची संधी तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या ३ IPO मध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता.

या काळात अनेक कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी (Investment) खुले होणार आहे. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)ने कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक (Bank), विभोर स्टील आणि क्रिस्टल सर्व्हिसेसचा आयपीओ खुला करण्यात आला आहे.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेला सेबीकडून ८ जानेवारीला Crystal Integrated Services ला ११ जानेवारी आणि Vibhor steel चा १२ जानेवारीला त्यांच्या IPO कागदपत्रांवर मंजुरी मिळाली आहे. रेग्युलेटरला या कंपन्यांच्या रेड-हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा ३ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला. जर तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर या IPO मध्ये तुम्ही गुंतवणूक करुन मालामाल होऊ शकता.

Upcoming IPO List
Petrol Diesel Rate (17th January): महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव किती? जाणून घ्या राज्यातील आजचे दर

1. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक

  • पंजाब कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेने २८ सप्टेंबरला पहिल्यांदा IPO खुला केला होता. कंपनीचा IPO 450 कोटी रुपयांचा (Price) आहे.

  • यामध्ये 24, 12,685 इक्विटी शेअर्सचे ताजे इश्यू आणि OFS समाविष्ट आहेत.

  • गुंतवणूकदार ओमान इंडिया जॉइंट इन्व्हेस्टमेंट फंड II, PI व्हेंचर्स LLP, Amicus Capital Private Equity I LLP, आणि Amicus Capital Partners India Fund OFS मध्ये भागधारकांना विकतील.

  • स्मॉल फायनान्स बँकेत 24.01 टक्के हिस्सा आहे आणि उरलेले 75.99 टक्के शेअर्स इतर गुंतवणूकदारांकडे आहेत. ज्यात ओमान इंडिया जॉइंट इन्व्हेस्टमेंट फंड समाविष्ट आहे. जो बँकेतील 9.47 टक्के हिस्सा असलेला सर्वात मोठा गुंतवणूदार आहे. नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स आणि इक्विरस कॅपिटल यांना या समस्येसाठी मर्चेंट बँकर्स नियुक्त केले आहेत.

2. विभोर स्टील ट्यूब्स आयपीओः

विभोर स्टील ट्यूब्स, दोन दशके जुनी स्टील पाईप आणि ट्यूब उत्पादने कंपनी, तिच्या आयपीओद्वारे 66.47 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. यात फक्त फ्रेश इश्यू आहेत. कंपनी IPO मधून मिळालेले पैसे भांडवलाच्या गरजांसाठी आणि इतर कॉपरिट गोष्टींसाठी वापरला जाईल.

Upcoming IPO List
Gold Silver Rate (16th January 2024): सोन्याचा भाव गडगडला, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा दर

3. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस IPO

IPO मध्ये क्रिस्टल फॅमिली होल्डिंग्सच्या 175 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि 17.5 लाख इक्विटी शेअर्सचा OFS समाविष्ट आहे. मुंबईस्थित क्रिस्टल इश्यूचे १०० कोटी रुपये खेळत्या भांडवलासाठी खर्च करणार आहे. याशिवाय प्रत्येकी 10 कोटी रुपये कर्जाची परतफेड आणि नवीन मशिनरी खरेदीसाठी वापरण्यात येणार आहेत. तर त्यातील उरलेले शेअर्स हे कॉर्पोरेट गोष्टींसाठी ठेवले जातील. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस ही कॉर्पोरेट क्रिस्टल फॅमिली होल्डिंग्सच्या मालकीची आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com