Solapur Farmer News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Farmer News : शेतकऱ्याची थट्टा ! 512 किलो कांदा विकला, पदरी दोन रुपयाचा चेक

बार्शीत दोन रुपयाचा चेक मिळालेल्या शेतकऱ्याचे आमरण उपोषण...

विश्वभूषण लिमये

Solpaur News : बार्शी तालुक्यातील 512 किलो कांद्यामागे दोन रुपये मिळालेले शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी बार्शी तहसील कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केल आहे. राजेंद्र चव्हाण यांच्या दोन रुपयाच्या चेकची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राजेंद्र चव्हाण यांनी कांद्याला हमीभाव मिळावा, कांद्याला अनुदान मिळावे, निर्यात बंदी उठवावी अशा मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. 

सोलापूर (Solapur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्याने झाडी बोरगाव येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना 512 किलोच्या कांद्याला (Onion) एक रुपया प्रमाणे 512 रुपये आले होते तर सर्व खर्च वजा जाऊन दोन रुपये राहिले होते. व्यापारी खलिफा यांनी दोन रुपयाचा चेक दिला होता. त्यानंतर विधिमंडळातही कांदा दराचा प्रश्न उपस्थित झाला. कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी चव्हाण यांना चेक घेऊन नाशिकला (Nashik) बोलावले होते. 

मात्र, शेतकरी राजेंद्र चव्हाण हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. सदर व्यापाऱ्यांनी दोन रुपयाचा चेक दिला होता.त्या दोन रुपयाचे औषध घेऊन मारावे म्हणाले, तरी चेक कामाचा नाही.राज्यातील शेतकऱ्याला प्रति किलो दहा रुपये कांद्याला अनुदान मिळावे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी आणि शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावे अशी मागणी राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

Sweet Corn Soup Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट घरी बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यातील बुधवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई

CJP Protest MPSC : MPSC विरोधात दिपके मैदानात; विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं पेपरफुटीचा वाद पेटला, MPSC विरोधात CJP आंदोलन उभारणार?

Sugarcane juice: उसाचा रस प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT