जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

jantar mantar constable resignation video : नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावेळी स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबल शेर सिंह याने राजीनामा दिल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, सिंह याला यापूर्वीच निलंबित केल्याचे उत्तराखंड पोलिसांनी स्पष्ट केले.

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सीजेपीचा संस्थापक अभिजीत दिपकेच्या नेतृत्वात तरुणाईचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला वेगवेगळ्या स्तरांतून पाठिंबा दिला जात आहे. दुसरीकडे, पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी जंतरमंतरवरील स्टेजवर पोलीस गणवेशात आलेल्या कॉन्स्टेबलने राजीनामा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेर सिंह असे त्याचे नाव आहे. आपण पोलीस सेवेतील नोकरी सोडत असल्याचे त्याने अभिजीत दिपकेंसमोरच जाहीर केले.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. शेर सिंह याला याआधीच पोलीस सेवेतून निलंबित केल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. शेर सिंह हा पित्तोरगढमध्ये तैनात होता. २८ जूनपासून तो नोकरीच्या ठिकाणी रुजू झालेला नाही. त्यामुळे २० जुलै रोजी त्याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, असे उत्तराखंड पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com