SSC Exam : ...म्हणून दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी कमी झालेत; बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितली वेगवेगळी कारणं

उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात
SSC Exam
SSC ExamSaam Tv

सचिन जाधव

SSC Borad Exam News : दहावीची बोर्डाची लेखी परीक्षा उद्यापासून (२ मार्च) सुरू होणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून बोर्ड सह इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. या परीक्षेची सुरुवात प्राथमिक भाषेच्या पेपरने होणार आहे. २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. तर विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटचे १० मिनिटं वाढवून देणार असल्याचंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

या परीक्षा ९ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहेत. या परिक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी देणार परीक्षा. यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी तर ७ लाख ३३ हजार ०६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा देणार आहेत. यावर्षी १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.

SSC Exam
Bhaskar Jadhav : त्या बिचा-याचा कंडाेम केला यांनी...भास्कर जाधवांचा Video Viral

मात्र, असेल असले तरी दहावीची परीक्षा (Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास १ लाख विद्यार्थी कमी झाल्याचे बोर्डाने सांगितलं आहे. इतर बोर्डाच्या (SSC Board) शाळेची संख्या वाढली असल्याने तसेच लोकसंख्या वाढीमुळे पालकांनी एकच मूल जन्माला घालण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे देखील विद्यार्थ्यांची संख्या घटली, असा दावा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

SSC Exam
Nandurbar News: गतवर्षीच्‍या तुलनेत लाल मिरचीचे उत्पादनात ६० टक्के वाढ; बाजार समितीत २ लाख क्विंटल आवक

महाराष्ट्र राज्य बोर्डाची दहावीची परीक्षा दोन टप्पयात घेण्यात येणार आहेत. पहिल्या सत्रातील परीक्षा ही सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यासाठी साडेदहा वाजताच परीक्षा केंद्रावर हजर व्हायचे आहे.

तर दुसऱ्या सत्रात होणारी परीक्षा ही तीन वाजता असणार आहे. त्यासाठी अर्धा तास अगोदर म्हणजेच अडीच वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रश्न पत्रिका तसेच व्हायरल होणाऱ्या सूचना यांना बळी पडू नये, अशी सूचना बोर्डाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com