Solapur Women Doctor End Life Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News: सोलापूरमध्ये महिला डॉक्टरने मृत्यूला कवटाळलं, नेमकं कारण काय?

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूरच्या मोहोळमध्ये राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन महिला डॉक्टरने आत्महत्या केली. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहोळ पोलिस पुढील तपास करत आहेत. मोहोळ शहरामध्ये नामवंत असलेल्या डॉक्टर रश्मी यांनी आत्महत्या केल्यामुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळमध्ये महिला डॉक्टरने राहत्या घरामध्ये आत्महत्या केली. पंख्याला गळफास घेऊन या डॉक्टरने आत्महत्या केली. १ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळमध्ये ही घटना घडली. डॉ. रश्मी संतोष बिराजदार असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. रश्मी यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मोहोळ मल्टी स्पेशालिटी हे तीन मजली हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर डॉक्टर रश्मी बिराजदार या आपले पती आणि दोन मुलांसोबत राहत होत्या. १ सप्टेंबर म्हणजे रविवारी सकाळी रश्मी यांचे पती संतोष बिराजदार हे स्वतःच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांनी त्यांना फोन करून डॉक्टर रश्मी यांनी गळफास घेतल्याचे सांगितले.

घटनेची माहिती कळताच डॉक्टर रश्मी यांच्या पतीला मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ घरी धाव घेतली. डॉक्टर रश्मी यांनी साडीने पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि डॉक्टर रश्मी यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मोहोळ पोलिस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT