सोलापूर : राज्यात अवकाळी पाऊस सुरु असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तिन्ही जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरत असलेले उजनी धरण आता प्लसमध्ये आले आहे. १२२ टीएमसीचे असणारे उजनी धरण गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे वधारून प्लसमध्ये आले आहे. यामुळे उन्हाळ्यात जाणविणारी पाण्याची समस्या मिटली आहे.
राज्यभरात अवकाळी पाऊस सुरु आहे. साधारण महिनाभरापासून हा पाऊस सुरु असल्याने अनेक नदी, नाल्यांना पूर आले आहेत. नद्यांना पूर आल्याने हे पाणी आता धरणांमध्ये जमा होऊ लागल्याने धरणाची खाली गेलेल्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. अर्थात मे महिन्यात हे चित्र निर्माण झाल्याने आजूबाजूच्या परिसरात जाणविणारी पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होत आहे.
निर्मितीनंतर प्रथमच धरण मे महिन्यात प्लसमध्ये
सोमवारी दिवसभरात उजनी धरण तब्बल सात टक्क्यांनी वधारले गेले. सोमवारी सकाळी वजा सात टक्के असणारे उजनी धरण आता प्लस मध्ये येऊन पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणाचा साठा जवळपास ६५ टीएमसी इतका प्लसमध्ये झालेला दिसून येत आहे. वास्तवामध्ये उजनी धरण हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यातील पावसामुळे प्लसमध्ये येते. मात्र यंदा प्रथमच मे महिन्यातच उजनी धरण हे वजा क्षमतेतून अधिक क्षमतेमध्ये आलेले आहे.
भोगावती नदी वाहतेय दुथडी
सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर म्हणजे मागच्या अनेक महिन्यापासून भोगावती नदी कोरडी पडली होती. मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे भोगावती नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. मागील ४० वर्षांच्या काळामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये भोगावती नदी दुथडी भरून वाहत असल्याच चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान, या नदीकाठावरील वाळूज, मनगोली, तडवळे ढोराळे, यावली इर्लेवाडी, इरले, साकत या गावांना सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.