Corona Update News Saam tv
महाराष्ट्र

Corona Update News: चिंता वाढली..सोलापुरात एकाच दिवशी आढळले दहा कोरोना बाधित रुग्ण

सोलापुरात एकाच दिवशी आढळले दहा कोरोना बाधित रुग्ण

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर (Solapur) शहरात एकाच दिवशी दहा कोरोना (Corona) बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर सोलापुरातील अनेक भागात नव्याने कोरोना रुग्ण आढळले आहेत. (Latest Marathi News)

राज्‍यात कोरोनाने पुन्‍हा डोके वर काढले आहे. दररोज बाधितांची संख्‍या वाढत आहे. यामुळे आरोग्‍य यंत्रणा देखील अलर्ट झालेली आहे. अशातच सोलापूर शहर व जिल्‍ह्यातील अनेक भागांमध्‍ये नवीन कोरोना बाधितांची संख्‍या वाढत आहे. यात सोलापूरात दिवसभरात दहा कोरोना बाधित आढळून आल्‍याने चिंता वाढली आहे. सोलापूर शहरात ४८ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर काम करत आहे.

८७ जणांची कोरोना चाचणी

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात ६९ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून योग्य दक्षता घेतली जात आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात काल ८७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील दहा जणांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोलापूर शहरात २९ पुरुष तर १९ महिला कोरोनावर उपचार घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : अंतरवाली सराटी आंदोलन प्रकरणात गंभीर गुन्हे मागे घेणार?

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : उत्सव मंडपात दगडूशेठ गणपती बाप्पा दाखल

Nagpur : खेळत असताना खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा जीव; पाण्यात बुडून मृत्यू

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रवाना

Maharashtra Government : आता १० तासांची शिफ्ट होणार? फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मंत्रिमंडळ बैठकीत झाली चर्चा

SCROLL FOR NEXT