Solapur Airport Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Airport: सोलापूर विमानतळ लवकरच सुरू होणार; पीएम मोदी आज करणार उद्घाटन

PM Narendra Modi Inaugurate Solapur Airport: सोलापूर विमानतळाचा उद्घाटन सोहळा पीएम मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडणार होता. पण त्यांचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. सोलापूर विमानतळाचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडणार होता. पण त्यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ते या विमानतळाचे उद्घाटन दिल्लीतून करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. विमानतळावर फक्त १०० जणांना प्रवेश मिळणार आहे. डीजीसीएकडून परवाना मिळाल्यानंतर सोलापूर विमानतळावरील विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला.

पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे येथून सोलापूर होटगीरोड विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होटगी रोड विमानतळावर होणार आहे. या ठिकाणी छोटेखानी सभामंडप उभारले असून या ठिकाणी डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच जिल्ह्यातील ११ आमदार, विधान परिषदेचे ३ आमदार यांच्यासह काही उद्योजक, व्यापारी तसेच मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या विमानतळाच्या उद्घाटनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीएने ११ आणि १२ सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून विमानतळाची पाहणी आणि तपासणी केली होती. विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डीजीसीएकडून करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात आल्यामुळे डीजीसीएकडून या विमानतळावरून विमान टेक ऑफ आणि लँडिंगचा परवाना मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT