Solapur Civil Hospital Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Solapur News: संतापजनक! गर्भवती महिलेला चक्क फरशीवर झोपवले, सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रकार; नातेवाईकांवरही अरेरावी

Solapur Civil Hospital Latest News: उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचारकांनी चक्क फरशीवर झोपवल्याचा प्रकार समोर आला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर, ता. १३ जुलै २०२४

गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचारिकांनी फरशीवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला असून याबाबत जाब विचारणाऱ्या नातेवाईकांशी परिचारिकेने वाद घालत उद्धटपणे उत्तरेही दिली. या सर्व प्रकारावरुन सर्वत्र संतात व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचारकांनी चक्क फरशीवर झोपवल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील या घटनेने संताप व्यक्त होत आहे. स्वाती मारचाला असे या गर्भवती महिलेचे नाव असून प्रसववेदना होत असल्याने तिला रुग्णालयात आणले होते.

धक्कादायक बाब म्हणजे प्रसववेदनेचा त्रास सहन करणाऱ्या गर्भवतीला फरशीवर झोपवल्याने त्यांच्या नातेवाईकांनी जाब विचारला. यावेळी जाब विचारणाऱ्या नातेवाईकांशीही परिचारिकेने वाद घालत उद्धटपणे उत्तरे दिली. या प्रकारानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, सध्या गर्भवती महिलेची प्रसूती झाली असून नवजात बालकाला आयसीयूमध्ये ठेवल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. गर्भवती महिलेला फरशीवर झोपवणाऱ्या संबंधित परिचारिकेवर कारवाई करावी अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT