Ahmednagar News: अहमदनगरमध्ये कोयता गँगच्या गुंडांचा धुमाकूळ; चहाच्या टपऱ्या फोडत रस्त्यावर घातला धिंगाणा, पाहा VIDEO

Koyta Gang Vandalized Tea Shop On Nagar Pune Road: अहमदनगर शहरात कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. नगर-पुणे रोडवर चहाच्या टपऱ्या पाडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
अहमदनगरमध्ये कोयता गँग
Ahmednagar NewsSaam Tv
Published On

सुशील थोरात, साम टीव्ही अहमदनगर

पुण्यानंतर आता नगरमध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. अहमदनगर शहरात कोयता गँगने धुडगूस घातल्याचं समोर आलंय. शहरातील नगर पुणे रोड वरील कायनेटिक चौक येथे रात्रीच्या सुमारास चहाच्या टपऱ्या दिल्या पाडून दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रात्रीच्या वेळी हातात कोयता घेवून टपऱ्या या गुंडांनी पाडल्या आहेत. फक्त दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी धुमाकूळ घातल्याचं समोर आलंय.

कोयता गॅंगचा धुमाकूळ

दहशत माजवण्यासाठी गुंडांनी छोट्या टपऱ्या पाडल्या आहेत. यामुळे टपऱ्या मालकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. गुंडांचा दहशतीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, गुंडांनी कोयता घेऊन रोडवर आरडा ओरड करत टपऱ्या पाडल्या. याप्रकरणी नगरमध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय.

कोतवाली पोलिसांनी काही वेळातच कोयता गॅंगमधील तीन गुंडांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी रात्री पाठलाग करून तीनही गुंडांना पकडलं असल्याचं समोर आलंय. अहमदनगरमध्ये कोयता गँगच्या गुंडांचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. चहाच्या टपऱ्या फोडत रस्त्यावर गुंडांनी धिंगाणा घातला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने समोर आलाय. या घटनेत टपऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

अहमदनगरमध्ये कोयता गँग
Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; मध्यरात्री १५ ते २० वाहनांची तोडफोड, नागरिक धास्तावले

याआधीची घटना

नगरमध्ये मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दहशत निर्माण करण्यासाठी कोयता गॅंगच्या गुडांनी टपऱ्या पाडल्या होत्या. नगर पुणे महामार्गावरील सुपा गावात ही घटना घडल्याचं समोर आलं होतं. गुंडाच्या हल्ल्यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा शहरामध्ये कोयता गॅंगच्या गुंडांची दहशत दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं दहशतीचं वातावरण आहे.

अहमदनगरमध्ये कोयता गँग
Pune Koyta Gang : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ, हडपसर परिसरात दुकानांची तोडफोड; व्यापाऱ्यांना धमकावलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com