Mohol Vandalism Case Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News : माजी आमदार रमेश कदम, ठाकरे गटाच्या नेत्यासह ७२ जणांना कोर्टाचा दणका; एक महिना कारावास

Rohini Gudaghe

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही सोलापूर

मोहोळ येथे केलेल्या तोडफोड प्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह ७२ कार्यकर्त्यांना एक एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे सोलापूरमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. नेमकं प्रकरण काय होतं, ते पाहू या.

मोहोळ येथील (Solapur News) उड्डाण पुलाखालील जाळी तोडणे आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह ७२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. त्याप्रकरणी ही शिक्षा आज सुनावण्यात आली आहे. २०१५ साली मोहोळ शहरातील उड्डाण पुलाखाली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी मज्जाव करत प्रशासनाकडून जाळी मारण्यात आली होती.

मात्र, जेसीबीद्वारे तत्कालीन आमदार रमेश कदम (Former MLA Ramesh Kadam) यांनी याविरोधात मोर्चा काढला होता. त्यांनी ही पुलाखालील जाळी तोडली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आंदोलन केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Thackeray Group Leader Sharad Koli)यांच्यासह एकूण ७२ जणांना १ महिना कारावास आणि १ हजाराचा दंड थोठावण्यात आला आहे.

दरम्यान सर्वसामान्य कष्टकरी आणि कामगारांसाठी आम्ही जेलमध्ये गेलो, तरी आम्ही आवाज उठवत राहणार अशी प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी दिली आहे. सर्वसामान्यांसाठी आवाज उठवत राहणार (Mohol Vandalism Case) अशी भूमिका माजी आमदार रमेश कदम यांनी स्पष्ट केली आहे. यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT