Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

Solapur News : शेतकऱ्यांमध्ये जुना वाद असून दोघांमध्ये या कारणातून कायम वाद होतात. दरम्यान बांधावरून पुन्हा एकदा वाद होऊन हा झालेला वाद विकोपाला गेला. यातून रागाच्या भरात शेतकऱ्याने केळीची झाडे उपटून टाकली

विश्वभूषण लिमये

सोलापूर : शेजारी शेजारी शेत असलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये बांधावरून जुना वाद आहे. या कारणातून दोघं शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला होता. शेतकऱ्यांमधला हा वाद विकोपाला गेला आणि रागातून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात लागवड केलेल्या तब्बल २०० केळीची झाडे उपटून उध्वस्त केली आहेत. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात हा प्रकार घडला आहे. दरम्यान शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांमध्ये होत असलेले वाद नवीन नाही. बांधावरून भांडण करत अनेकदा एकमेकांवर जीवघेणा हल्ला देखील केला जात असतो. अशाच प्रकारे बांधावरून बार्शी तालुक्यातील या शेतकऱ्यांमध्ये वाद आहे. दोघांमध्ये कायम वाद होत असतात. दरम्यान दोन शेतकऱ्यांच्या बांधावरून निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याचे पाहण्यास मिळाले. 

२०० झाडे केली नष्ट 
शेताच्या बांधाच्या कारणावरून झालेली बाचाबाची डोक्यात ठेवत सागर घुगे या युवा शेतकऱ्याची तब्बल २०० केळीची झाडे उध्वस्त करण्यात आली आहे. सागर घुगे यांच्या शेजारील शेतकरी संतोष घुगे यांनी हि केळीची झाले नष्ट केल्यास सागर यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यातून सागर घुगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

शेतकऱ्याविरोधात पोलिसात तक्रार  

दरम्यान रागाच्या भरात केळीची झाडे उध्वस्त करणाऱ्या संतोष घुगे या शेतकऱ्याच्या विरोधात सागर घुगे यांनी बार्शी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर केळीचे झाडे उध्वस्त करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याची आहे. यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांसह शेतात येऊन पाहणी केली आहे. आता या प्रकरणी काय कारवाई होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

Maharashtra Politics : ठाकरेंच्या जागेवर शिंदे-मनसे लढत; उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मशाल पेटणार, इंजिन धावणार!

Beed Politics : 'मुंडे प्रचाराला आल्यास विपरित घडेल'; बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस?

Arnav Khaire : अर्णव खैरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; लोकलमध्ये मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल

Mahayuti Tension: सन्मानजनक द्या नाहीतर तुमचा खेळ खल्लास; शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT