Beed : शेतकऱ्यांचे थेट बांधावरच धरणे आंदोलन; सरपंच संघटनेचा पाठींबा, सरकारला दिला इशारा

Beed News : गेवराई तालुक्यातील औरंगपूर कुकडा कवडगाव येथील शेतकऱ्यांचा गेल्या सात दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज सरपंच उपसरपंच संघटनेने पाठिंबा
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

योगेश काशीद 

बीड : मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे अद्याप सुरु असून मदत कधी मिळणार; असा प्रश्न आहे. मात्र शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी; यासाठी शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरच आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला सरपंच, उपसरपंच संघटनेने पाठींबा देत सरकारला इशारा दिला आहे. 

बीड जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यामध्ये धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. परिणामी शेतकरी हताश झाला असून २०२३ च्या निकषाप्रमाणे बागायती जमीन असताना शेतकऱ्यांना जिराईत जमीन म्हणून मदत दिली जात आहे. अधिकारी पंचनामा करायला सहकार्य करत नाहीत. यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी थेट आता गावातीलच शेतीच्या बांधावर धरणे आंदोलन सुरू केला आहे.  

Beed News
Nagpur : दिवाळीसाठी चक्क साखरेने भरलेला ट्रकच नेला चोरून; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा 

गेवराई तालुक्यातील औरंगपूर कुकडा कवडगाव येथील शेतकऱ्यांचा गेल्या सात दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज सरपंच उपसरपंच संघटनेने पाठिंबा दिला असून तात्काळ शेतकऱ्यांची दखल घ्यावी व निकष न लावता २०२३ च्या निकषाप्रमाणे मदत करावी; अशी मागणी संघटनेने केली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सरकारसमोर व्यथा मांडणार आहोत असेही आश्वासित केले आहे.  

Beed News
Shirpur Police : सराईत गुन्हेगाराची पोलिसांच्या हातावर तुरी; शिरपूर पोलीस ठाण्यातून पसार

तर अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी; अशी मागणी केली जात आहे. तर येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांना २०२३ च्या निकषा प्रमाणे मदत द्या; अन्यथा एकाही अधिकाऱ्याला बीडमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही. अशा इशारा सरपंच उपसरपंच संघटनेकडून देण्यात आला आहे. यामुळे प्रशासन किंवा शासन काय दाखल घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com