Shirpur Police : सराईत गुन्हेगाराची पोलिसांच्या हातावर तुरी; शिरपूर पोलीस ठाण्यातून पसार

washim News : रात्रीच्या वेळी आरोपीने लघुशंका आल्याचा बहाणा केला. पोलिसांनी त्याला बाहेर नेले असता हाताला झटका देत आरोपीने रात्रीच्या अंधारात पळ काढला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे
Shirpur Police
Shirpur PoliceSaam tv
Published On

शुभम देशमुख 
वाशीम
: वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीने पोलीस ठाण्यातूनच पोबारा केल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असून अद्याप त्याचा तपास लागलेला नाही. 

चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. गोपाल पवार असं सराईत गुन्हेगाराचे नाव असून आरोपीवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान रात्रीच्या वेळी आरोपीने लघुशंका आल्याचा बहाणा केला. यानंतर पोलिसांनी आरोपीला लघुशंका करण्यासाठी बाहेर नेले असता शिरपूर पोलीस स्टेशनच्या मागील परिसरात नेले. यावेळी आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला हिसका मारून पळ काढला. 

Shirpur Police
Nagpur : दिवाळीसाठी चक्क साखरेने भरलेला ट्रकच नेला चोरून; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना 
या घटनेनंतर पोलीस ठाण्यात आणि संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपीने पळ काढल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. मात्र सापडून आला नाही. यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी रात्रीच नाकाबंदी करण्यात आली. तसेच विविध पोलीस टीम आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाल्या आहेत. मात्र अद्याप फरार आरोपीचा शोध लागलेला नाही. 

Shirpur Police
Maval : मावळच्या तिन्ही नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेची सोडत; वडगाव नगराध्यक्ष महिला राखीव

चक्क वर्दीवर पोलिस खेळत आहे रमी
लातूरच्या किल्लारी येथे पोलीस हवालदार ऑन ड्युटी मोबाईलवर रमी खेळत असताना व्हिडिओ समोर आला आहे. किल्लारी पोलीस ठाण्याचे दत्तात्रय जाधव अस या पोलीस हवालदाराचं नाव समोर येत आहे. ड्युटीवर असताना वर्दीवरच त्यांनी रमी गेम खेळत जाण्याचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळं अशा गलथान पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली जाणाऱ्या हे पाहणं महत्त्वाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com