Solapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime : इंजिनिअर तरुणाने चोरल्या दुचाकी; सुटे पार्ट करत भंगारमध्ये विकले, ८ दुचाकींसह चोरटा ताब्यात

Solapur News : सोलापूरच्या सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत चोरी झालेल्या दुचाकींचा शोध घेतला जात असताना संशयित अडकला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आठ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे

विश्वभूषण लिमये

सोलापूर : दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या असून सोलापूरमध्ये तर एका इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाने दुचाकी चोरीचा धंदा सुरु केला होता. चोरीनंतर या गाड्यांचे वेगवेगळे पार्ट करून ते भंगारमध्ये विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चोरीच्या आठ दुचाकींसह चोरट्याला ताब्यात घेतले आहे. 

सोलापुरात दुचाकी चोरीचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेणारा साहिल महेबूब शहापुरे (वय २२, रा. दक्षिण सदर बाझार, अशोक नगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान शहरातील वेगवेगळ्या परिसरातून तरूणाने दुचाकी चोरल्या. यानंतर वडिलाच्या भंगार दुकानात त्याचे पार्ट वेगवेगळे करून रहिम इरफान शेख या भंगारवाल्याला विक्री करत होता. 

संशयित हालचालींवरून पकडले 

सोलापूरच्या सदर बाझार पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सागर काटे यांच्या पथकाला हरीभाई प्रशालेच्या मागील बाजूस साहिल संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याला एका दुचाकीसोबत पकडले असता आठ दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. अधिक चौकशी केली असता पार्ट देखील विक्री केल्याचे सांगितले. 

तिघांवर गुन्हा दाखल 

दुचाकी चोरी करणारा साहिल यांच्यासह साहिलचे वडील महेबूब शहापुरे व भंगार विकत घेणाऱ्या रहीम इरफान शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींकडून ८ दुचाकी आणि तीन गाड्यांचे सांगाडे जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान साहिल यास न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT