Solapur News Big Blow to Sharad Pawar ncp district president son Join Ajit Pawar Group Saam TV
महाराष्ट्र

Solapur News: शरद पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याच्या मुलाचा अजितदादांच्या गटात प्रवेश

Solapur NCP News: सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक बळीराम साठे यांचे पुत्र जितेंद्र साठे अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur NCP News: अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानं पक्षात उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजितदादांना पाठिंबा दिला आहे. अजूनही काही आमदार आणि पदाधिकारी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. एकीकडे शरद पवार नव्याने पक्षबांधणी करत असताना दुसरीकडे सोलापूरमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे.

सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक बळीराम साठे यांचे पुत्र जितेंद्र साठे अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. जितेंद्र साठे हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्या मध्यस्थीने त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे खंदे समर्थक बळीराम साठे यांच्या पुत्रानेच अजित पवारांच्या गटात प्रवेश केल्याने सोलापुरात शरद पवार यांच्या गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

बळीराम साठे यांच्यापाठोपाठ सोलापुरातील (Solapur News) राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये विभागणी झाली आहे.

आज मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि त्यांच्या मुलामध्ये फाटाफूट झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील साठे यांचे वर्चस्व असलेला हा भाग मोहोळ मतदारसंघात येतो.

गेल्या वर्षभरापासून मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. त्यावेळीही साठे यांच्याबाबत सोलापूरच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र, त्यांनी आपण भाजप सोबत जाणार असे कधीही जाहीरपणे सांगितलेले नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT