Solapur News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News : हळद लागण्याआधीच तो रक्ताच्या थारोळ्यात; हॉटेलमधून परतताना युवकावर काळाचा घाला

कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार; पुढच्या महिन्यात होते लग्न.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : ऐन दिवाळीत, महिनाभरावर लग्न आलं असताना हॉटेलमधून जेवण करून परतणाऱ्या एका युवकाचा कारच्या धडकेत दुर्देवी मत्यू झाला आहे. आदर्श विठ्ठल जाधव असं मयत युवकाचं नाव आहे. (Solapur)

आदर्श हा आपल्या मित्रासोबत हैदराबाद रोडवरील (Hyderabad Raod) दहिटणे फाट्याजवळील एका हॉटेलमधून जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण करून परतत असताना एका कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये आदर्श आणि त्याचा मित्र दोघे जखमी झाले. या दोघा जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्मालयात हलवलं. मात्र, आदर्शचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Accident)

दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये (MIDC Police Station) झाली आहे. तर मयत आदर्श याचे रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्याचे टेंडर होते. तर त्याचे पुढील महिन्यात लग्न होते अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. त्यामुळे लग्नात हात पिवळे होण्याआधीच आदर्श रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने जाधव कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio VIP Numbaer: Jio व्हीआयपी नंबर कसा मिळवावा? फॉलो करा ही खास ट्रिक

Beed Rain : गेवराई तालुक्यात ऊस पिकाचे अतोनात नुकसान; मदत वाढवून देण्याची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

Cholesterol Control Tips: गोळ्या, औषधं घ्यायची गरजच नाही! ५ उपाय करतील कोलेस्ट्रॉल कमी, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

Kanya Pujan 2025: नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी कन्या पूजा का करतात?

SCROLL FOR NEXT