Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur : १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील धक्कादायक घटना

Solapur News : काल सायंकाळच्या सत्रात प्रशिक्षणार्थींमधील जवळपास १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना उलटी, जुलाब आणि मळमळचा त्रास सुरू झाला. यानंतर सर्वाना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याहंस धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून १७ प्रशिक्षणार्थींवर पोलिसांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 

सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात जवळपास १४०० पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान काल सायंकाळच्या सत्रात प्रशिक्षणार्थींमधील जवळपास १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना उलटी, जुलाब आणि मळमळचा त्रास सुरू झाला. यानंतर सर्वाना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अधिकृत कारण शोधण्यासाठी संबंधित विभाग कार्यरत आहे. 

१७ जणांवर अजूनही उपचार सुरु 

केंद्रातील टप्प्याटप्प्याने अनेक प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवू लागला होता. एकामागून एक प्रशिक्षणार्थी आजारी पडत गेल्याने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. यामधील १७ जणांवर अजूनही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरितांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मात्र मोठ्या संख्येने बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.

अन्नाचे नमुने तपासणीसाठी 
दरम्यान १७० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना त्रास जाणवू लागल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान बाधितांवर उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती आता स्थीर असल्याची माहिती असून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून प्रशिक्षण केंद्रात हलवलं जातं आहे. दरम्यान केंद्रातील अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT