Solapur Muncipal Corporation  Saam TV
महाराष्ट्र

सोलापूर महापालिकेचा उपक्रम; वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिली नोकरी

सोलापूर महापालिकेने एवढ्यावरच न थांबता वारांगणा महिलांसोबतच तृतीयपंथीयांनाही रोजगार दिला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापुरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर महापालिका, क्रांती महिला संघ आणि शहर पोलिस आयुक्तालयाने एक अनोखा उपक्रम राबविला आहे. सोलापुरातील वारांगणा अर्थात वेश्याव्यवसाय करणाऱ्या दहा महिलांना सोलापूर महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पात नोकरी देण्यात आली आहे. त्यामुळे या महिलांना आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होणार आहे.

सोलापूर महापालिकेने एवढ्यावरच न थांबता वारांगणा महिलांसोबतच तृतीयपंथीयांनाही रोजगार दिला आहे. क्रांती महिला संघाच्या माध्यमातून या वारांगणा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाते. त्यांच्या मार्फतच या महिलांना सोलापूर महापालिका प्रशासनाने नोकरी दिली.

महिलांच्या पार्श्वभूमीचा विचार न करता महिलांना नोकरी दिल्याबद्दल महिलांच्या प्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. दरम्यान या महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी तसेच त्या माध्यमातून त्यांचे सामाजिक प्रश्न मिटावेत यासाठी त्यांना रोजगार देण्यात आला आहे. यापुढेही वंचित घटकातील महिलांना आधार देण्यासाठी तसेच समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांना महापालिकेच्या धनकचरा व्यवस्थापन विभागात नोकरी दिल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Right : सासू-सासऱ्याच्या संपत्तीवर जावई-सुनेचा हक्क असतो का? कायदा काय सांगतो

Maharashtra Live News Update : धूलीवंदन निमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवेच्या वेळेत बदल

Holi Bhang Hangover: भांगची नशा कशी उतरवायची?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना फेब्रुवारीचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Shia Muslims: खामेनेईंच्या मृत्यूनंतर शिया मुस्लिम आक्रमक, आंदोलनाच्या तयारीत; भारतासह जगभरात किती लोकसंख्या?

SCROLL FOR NEXT