Former MLA Vinayakrao Patil nephew ends his life  Saam Tv News
महाराष्ट्र

Soalpur Crime : मुलाची सतत शिवीगाळ अन् मारहाण, त्रासाला कंटाळून माजी आमदाराच्या पुतण्याने आयुष्य संपवलं; रेल्वेला धडकून...

Solapur Principal Commits Suicide : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाशी सतत भांडणं आणि तो देत असलेल्या शिवीगाळामुळे कंटाळून वडिलांनी रेल्वेला धडकून आत्महत्या केली आहे.

Prashant Patil

सोलापूर : मला काही जॉब नाही, मला काहीतरी उद्योग धंदा करून द्या, असं म्हणत एका हायस्कूलला मुख्याध्यापक असलेल्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केल्याने व मुलाच्या वारंवारच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून लऊळ (ता.माढा) येथील कुर्डूवाडी पंढरपूर रेल्वे लाईनवर जाऊन रेल्वेपुढे वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत बाळासाहेब पितांबर पाटील (रा. सापटणे भोसे ता माढा, वय ५६) हे मयत झाले असून याबाबत निखिल बाळासाहेब पाटील (वय ३०, धंदा-नोकरी रा.सापटणे(भो) ता.माढा) याने दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा संशयित आरोपी सौरभ बाळासाहेब पाटील (वय २४ वर्ष रा.सापटणे (भो) ता. माढा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सापटणे भोसे येथे राहत्या घरी फिर्यादीचा भाऊ सौरभ बाळासाहेब पाटील याने मला काही जॉब नाही मला उद्योग धंदा करून द्या, म्हणून पूज्य सुगंधाताई पाटील विद्यालय चिंचोली (ता. माढा) येथे मुख्याध्यापक असलेले वडील बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर शिवीगाळ करून भांडण केलं होतं. यावेळी त्याने मारहाणही केली होती. त्याच्या नेहमीच्या शिवीगाळ तसेच मारहाण करण्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी लऊळ शिवारात ढोरे वस्तीजवळ येऊन रेल्वे रूळाच्याजवळ चालत्या रेल्वेला धडकून आत्महत्या केली. त्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यास पुर्णत: आरोपी सौरभ बाळासाहेब पाटील याने प्रवृत्त केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे संशयित आरोपी मुलगा सौरभ पाटील याच्यावर बी.एन.एस कलम १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सौरभ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.

मयत मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील हे माजी आमदार विनायकराव पाटील यांचे पुतणे होते. ते चिंचोली येथील पूज्य सुगंधाताई पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सन २०२७ दरम्यान ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांनी घटनेतील आरोपी मुलगा सौरभ याला मागील दोन चार वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी कर्नाटकमध्ये मोठी रक्कम देऊन प्रवेश घेतला होता.परंतु तेथूनही हा मुलगा अर्धवट शिक्षण सोडून घरी परत आलेला होता. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व भांडणे होत होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून त्यांच्यावर सापटणे या गावी काल मंगळवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार; मुंबईत मनसेचे बॅनर झळकले

Irfan Pathan : कुत्र्याचं मांस खाल्ल असल्याने...; विमानात इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदीमध्ये राडा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT