Solapur EVM voting machine failure Saam TV
महाराष्ट्र

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Solapur Lok Sabha Election 2024: दक्षिण सोलापूरमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.

Satish Daud

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून नागरिकांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. अशातच दक्षिण सोलापूरमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मागच्या १५ ते २० मिनिटांपासून मतदान थांबलं आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. माजी सहकार मंत्री आणि सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख हे देखील मतदानासाठी खोळबंले होते.

जवळपास अर्ध्या तासापासून सुभाष देशमुख रांगेत उभे राहून मतदानाची वाट पाहत होते. यावेळी अधिकाऱ्यांनी दोन वेळा मशीन बदलून पाहिल्यानंतर देखील मशीनमध्ये तांत्रिक अडचण समोर येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, मशीन दुरुस्तीसाठी प्रशासकीय अधिकारी बुथच्या दिशेने रवाना झाले आहे.

वेळ पडल्यास ईव्हीएम मशीन बदललं जाईल, असं सांगण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी देखील राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. आता सोलापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते अशी थेट लढत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

SCROLL FOR NEXT