Solapur Vande Bharat Express flood delay  Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Solapur Flood News : महामार्ग बंद; लालपरीची चाके थांबली, वंदे भारत एक्सप्रेस ठप्प, सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे मेगाहाल

Solapur ST bus service cancelled due to flood : सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेससह इतर रेल्वे गाड्या ठप्प आहेत. सीना नदीला पूर आल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद झाले असून एसटी बस वाहतूक थांबली आहे. प्रवाशांचे हाल होत आहेत.

विश्वभूषण लिमये, Namdeo Kumbhar

Solapur Vande Bharat Express flood delay : अतिवृष्टीमुळे सोलापूरमध्ये भयानक परिस्थिती झाली आहे. शेतामध्ये नद्यांचे स्वरूप आलेय, घरांमध्ये पाणी शिरलेय. सीना नदीला पूर आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. लालपरी जागेवरच थांबून आहे. दुसरीकडे एक्सप्रेस ट्रेनही ठप्प झाल्या आहेत. सालापूरमधील रेल्वे रूळाला पाणी लागल्याने स्टेशनमध्ये एक्सप्रेस आणि वंदे भारत थांबून आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांत सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ६ वाजता सोलापूरहून निघणारी वंदे भारत एक्सप्रेस अद्याप स्टेशनवरच थांबून आहे. रेल्वे पूलाला पाणी लागले आहेत, त्यामुळे जोपर्यंत नदीचा प्रवाह सामान्य होत नाही, तोपर्यंत वाहतूक ठप्प राहणार आहे. रस्ते मार्गही बंद आहेत, रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

वंदे भारतला लेट मार्क -

सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसलाही पावसाचा फटका बसला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर स्थानकातून अद्याप निघालेली नाही. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवासी बसलेले आहेत, पण पावसामुळे वंदे भारत एक्सप्रेस अद्याप निघालेली नाही. सोलापूरमधील रेल्वे पूलापर्यंत पाणी आलेले आहे, त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सध्या ३ तासांतापासून सोलापूरमध्येच आहे. त्याशिवाय इतर रेल्वेही ठप्प आहेत.

लालपरीची चाके थांबली -

सोलापुरातील सीना नदीच्या महापुराचा एसटी वाहतुकीला फटका बसला आहे. सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक महामार्ग बंद झाल्यामुळे इतर भागाशी संपर्क तुटल्यामुळे एसटीची चाकं थांबली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि विदर्भात जाणाऱ्या एसटी बसेस सोलापुरात अडकून आहे. सोलापुरातून इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. मराठवाड्यातून आलेल्या प्रवाशांना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, मुंबई जाणारी वाहतूक रद्द झाल्यामुळे सोलापूर एसटी स्थानकावर बसण्याचे अली वेळ.

दोन महामार्ग बंद -

सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने सोलापूर रेल्वे जंक्शनवर प्रवाश्यांची तुफान गर्दी दिसून येत आहे. सीना नदी पातळीत वाढ झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सोलापूर हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार समजले जाते, मात्र रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने प्रवश्यांनी रेल्वेपसंती दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रात्री १० वाजल्यापासू सोलापूर-पुणे महामार्ग बंद करण्यात आला आहे.

सोलापूर पूर परिस्थितीमध्ये व्हाईट आर्मीच्यावतीने रेस्क्यू ऑपरेशन

सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या पूर सदृश्य परिस्थितीमध्ये फ्लड रेस्क्यू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सोलापूर यांच्या विनंतीवरून कोल्हापूर मधील व्हाईट आर्मीची टीम पूर बाधित ठिकाणी पोहोचलेली आहे. उत्तर सोलापूर, माढा तालुक्यामध्ये उंदरगाव या ठिकाणी नायकवडे वस्तीमध्ये 72 अडकले होते, त्यांना सुखरूप रबरी बोटीसहाय्याने बाहेर काढले आहे. तसेच जवळपास 15 वाड्या वस्त्यांमधील शंभर गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी रेस्क्यू करण्याचे काम करण्यात आले. रात्रीचे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले असून आज सकाळी म्हाडा तहसीलदार हद्दीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

डोंबिवलीत मोठा राडा! दोन महिला गटांमध्ये वाद, फेरीवाल्या महिलेने अंगावर पेट्रोल ओतले अन्...

Sangram Jagtap: राष्ट्रवादीत 'संग्राम', अजित पवारांना 'ताप' जगतापांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच

De De Pyaar De 2 Trailer: अजय देवगण-रकुलच्या प्रेमात आर माधवन ठरणार अडसर; ट्रेलर पाहून हसून हसून पोट दुखेल

Credit Card: क्रेडिट कार्डचं कर्ज वाढत चाललंय? घाबरु नका! वापरा स्मार्ट अन् सोप्या टिप्स, बिल होईल कमी

SCROLL FOR NEXT