Heavy Rains Lash Marathwada Rain : पावसाने मराठवाड्यात तांडव घातला आहे. धाराशिव, बीड, जालन्यासह संभाजीनगरमध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. नद्या-नाल्यांना पूर आलाय. आतापर्यंत शेकडो जनावरे दगावली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात मराठवाड्यात पावसाने ८ जणांचा बळी घेतला आहे. तर या आस्मानी संकटामुळे शेकडो जनावरे दगावली आहेत. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यात अतिशय जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्याला पाऊस झोडपणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात बचाव कार्य आणि मदतीसाठी छत्रपती संभाजी नगर, नाशिक जिल्ह्यातून आर्मीची टीम पाठवण्यात आली आहे. बीड, धाराशिव आणि परभणीमध्ये आर्मीला बोलवले. गोदावरी नदीपात्रातून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात पाणी वाढत असल्याने खबरदारी घेणे सुरू झाले आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस झाल्याने हाहाकार उडाला आहे. चोवीस तासांमध्ये १२९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक बीड जिल्हा 57 तर धाराशिव आणि परभणी मध्ये ४३ मंडळात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 24 तासात ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १४५ जनावरे दगावल्याची नोंद आहे.
मराठवाड्यात १२९ मंडळात अतिवृष्टी
12 संभाजीनगर
5 जालना
57 बीड
10 लातूर
21 धाराशिव
२२ परभणी
२ हिंगोली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर, बोरसर, भायगाव, जानेफळ, नांदगाव अनेक गावात पहाटे एक तास मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नदी नाल्याला पूर आला आहे. वैजापूर शहरात अनेक घरात पाणी शिरले. गेली दोन आठवड्यापासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले तर वस्त्यांमध्ये पाणी शिरत असल्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय. बीड, धाराशिव आणि जालन्यामध्ये २४ तासात पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे धाराशिवमध्ये शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.