सोलापूरचे माजी खासदार आणि काँग्रेसचे निष्ठावंत नेते धर्मण्णा मोंडय्या सादूल यांचे आज निधन झाले. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणतज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वृद्धापकाळात प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी अलिकडेच तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला होता. सोलापूर शहराच्या पूर्व भागातील विणकर पद्मशाली समाजातून आलेले धर्मण्णा सादूल हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते.१९८९ सालची सार्वत्रिक आणि १९९१ सालच्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत सादूल हे काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर मतदारसंघातून निवडून आले होते.
धर्मण्णा सादूल १९८९ साली सोलापूराचे महापौर होते. याच वर्षी त्यांना काँग्रेसने सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी दिली. तत्कालीन दिवंगत संपादक रंगाआण्णा वैद्य यांच्या आव्हानाला मात करून सादूल निवडून आले होते. त्यानंतर १९९१ मध्ये सलग दुसऱ्यांदा ते खासदार झाले. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी केंद्रात त्यांना मंत्रीपदाचीही संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांची ही संधी हुकली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धर्मण्णा सादूल एका सामान्य कुटुंबातून राजकारणात आले होते. तरुणपणात त्यांनी १९७४ मध्ये काँग्रेसकडून सोलापूर महापालिकेची निवडणूक लढवली होती. यात ते विजयी झाले होते. त्याआधी ते सोलापूर जिल्हा सहकारी बँकेत कर्मचारी होते. त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.