Maharashtra political suspense rising after Eknath Shinde Group MPs Wish to Contest Lok Sabha Elections on BJP's Lotus Kamal Symbol
Maharashtra political suspense rising after Eknath Shinde Group MPs Wish to Contest Lok Sabha Elections on BJP's Lotus Kamal SymbolSAAM TV

Maharashtra Politics : 'कमळा'वरून महाराष्ट्रात 'खल'; शिंदे गटाकडून खंडन, आता अजित पवार गटाबाबत मोठा दावा

Shinde Group MP Wish to Contest Lok Sabha Elections on BJP's Symbol: शिंदे गटाच्या खासदारांनी भाजपचं चिन्ह असलेल्या कमळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या चर्चेचे वृत्त धडकल्यानंतर त्याचा तडाखा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला बसण्यास सुरुवात झाली.
Published on

Maharashtra Political Breaking News:

शिंदे गटाच्या खासदारांनी भाजपचं चिन्ह असलेल्या कमळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या चर्चेचे वृत्त धडकल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळ ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. 'कमळा'वरून अक्षरशः राजकीय खल सुरू झाला आहे. शिंदे गटाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत खळबळजनक दावा करून या चर्चेला वेगळीच फोडणी दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra political suspense rising after Eknath Shinde Group MPs Wish to Contest Lok Sabha Elections on BJP's Lotus Kamal Symbol
Yoga Tips : दिवसभर काहीही खाल्ल्यानंतर संध्याकाळी योगा करणे योग्य की, अयोग्य? जाणून घ्या

शिंदे गटाबाबत काय होतं वृत्त?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार भाजपचे चिन्ह कमळावर निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाऐवजी भाजपच्या कमळ या चिन्हावर आगामी निवडणूक लढवण्याची इच्छा काही खासदारांनी व्यक्त केल्याची चर्चा सुरू असल्याचे वृत्त काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा 'खल' सुरू झाला.

शिंदे गटाने दिलं स्पष्टीकरण

शिंदे गटाच्या खासदारांची 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याच्या वृत्तानंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बाजू स्पष्ट केली आहे. सर्व खासदार शिवसेनेच्या चिन्हावरच निवडणूक लढवतील. काही जण अफवा पसरवत आहेत. आम्ही १३ खासदार बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत कोणतीही चर्चा वरिष्ठ पातळीवर झाली नाही. परंतु, शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची यापूर्वीच चर्चा झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'आमचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार नाही'

संजय शिरसाट यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जे वृत्त प्रसिद्ध झाले, ते चुकीचे आहे. आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत. भाजपसोबत आमची २५ वर्षे जुनी युती आहे. आमचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार नाही किंवा कमळावर निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Maharashtra political suspense rising after Eknath Shinde Group MPs Wish to Contest Lok Sabha Elections on BJP's Lotus Kamal Symbol
Shivsena Political News : शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; पालघरमधील ४ नगरसेवक तर लातूरचे माजी जिल्हाप्रमुख शिंदे गटात

शरद पवार गटाचा मोठा दावा

शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सर्व पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. फक्त शिंदे गटाचेच नाहीत, तर अजित पवार गटालाही भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल, असे पवार म्हणाले.

Maharashtra political suspense rising after Eknath Shinde Group MPs Wish to Contest Lok Sabha Elections on BJP's Lotus Kamal Symbol
Maharashtra Politics: राजस्थान-मध्यप्रदेशानंतर आता महाराष्ट्रातही धक्कातंत्र; अजित पवारांनी सांगितला महायुतीचा प्लान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com