Solapur Farmer Dies Saam
महाराष्ट्र

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Solapur Farmer Dies: सोलापुरातील शेतकऱ्याचा साप चावल्याने मृत्यू. पुराच्या पाण्यासोबत घरात शिरलेल्या विषारी सापाने दंश केला.

Bhagyashree Kamble

  • सोलापुरात शेतकऱ्याचा मृत्यू.

  • पुराच्या पाण्यासोबत साप घरात शिरला.

  • परिसरात हळहळ.

सोलापूरातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. पुरात वाहून आलेल्या विषारी सापाच्या दंशाने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील सीना नदीला पूर आला होता. पुराचं पाणी शेतकऱ्यांच्या घरातही शिरलं होतं. याच पुराच्या पाण्यातून विषारी साप घरात शिरला. सापाच्या दंशामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.

केरप्पा बजरंग बंडगर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते उत्तर सोलापुरातील पाथरी गावातील रहिवासी होते. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे. संततधारेमुळे अनेक भागात महापूरससदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी शेतीची झालेली नासधूस पाहून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मराठवाडा आणि सोलापुरातील परिस्थिती अतिशय भयावह झाली आहे. अशातच आणखी एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे.

सोलापुरात सीना नदीला पूर आला होता. पुरात काही शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता. केरप्पा बजरंग बंडगर यांच्या घराचंही नुकसान झालं. सीना नदीच्या पुराचं पाणी केरप्पा यांच्या घरात घुसलं होतं. २० सप्टेंबर रोजी पुराच्या पाण्यासोबत विषारी सापही शिरला होता. याचं पाण्यात वाहून आलेल्या विषारी सापाने बंडगर यांना दंश केला होता.

यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल केलं होतं. २० सप्टेंबरपासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT