Shocking news X
महाराष्ट्र

Shocking : वैष्णवीनंतर पुन्हा संतापजनक प्रकार, हुंड्यामुळे सोलापुरात विवाहितेला मारहाण, विष पाजण्याचा प्रयत्न; महाराष्ट्र पुन्हा हादरला

Solapur News : सोलापूरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका विवाहित महिलेला तिच्या दीर आणि जावेकडून मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमुळे जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Yash Shirke

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्यापायी सासरच्या मंडळींनी वैष्णवीचा छळ केला, तिला मारहाण केली. हे प्रकरण ताजं असताना घरगुती हिंसाचाराची बातमी सोलापूरमधून समोर आली आहे. पीडित महिलेला दीर आणि जाऊ यांच्याकडून मारहाण करण्यात आली होती. मागील दहा दिवसांपासून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या विवाहित महिलेचे नाव चित्रा सतीश भोसले असे आहे. दीर संतोष भोसले, निलेश भोसले आणि जाऊ निलीता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांनी मिळून चित्राला काठी, रॉडच्या सहाय्याने मारहाण करत विष पाजण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारल्याचे व्रण आहेत. मारहाणीत चित्राचा कानाचा पडदा फाटल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. चित्रा भोसलेचे दीर आणि जाऊ यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर १४ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पण या प्रकरणात पोलीस दिरंगाई दाखवत आहेत, आरोपी अजूनही फरार आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

२००७ मध्ये चित्रा भोसले हिचा विवाह सतीश भोसलेशी झाला होता. त्यानंतर हुंड्यासाठी चित्राला सासरकडच्यांनी त्रास दिला. २०१४ मध्ये सासरच्या मंडळींच्या विरोधात ४९८ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षानंतर भोसले कुटुंबियांनी चित्राला नांदवण्यासाठी लेखी हमी दिली. तेव्हा चित्रा सासरी राहण्यासाठी गेली होती. पण दीर आणि जाऊ यांनी पुन्हा चित्राला त्रास द्यायला सुरुवात केली. चित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तिचा दीर आणि जाऊ यांच्या विरोधात वाढीव कलम लावून अटक व्हावी अशी मागणी चित्राचे वडील आणि भाऊ यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT