सोलापूर : रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेत सोलापूर-दौंड, सोलापूर-कलबुर्गि आणि दौंड-कलबुर्गि मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांना नियमित गाड्यांचा दर्जा दिला आहे. १५ ऑगस्ट २०२६ पासून या गाड्या नवीन क्रमांकांसह नियमित पॅसेंजर गाड्या म्हणून धावणार आहेत. यामुळे सोलापूर, पुणे, दौंड, कलबुरगि आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेष गाडी क्रमांक 01461/01462 आता 71434/71433 या क्रमांकाने सोलापूर-दौंड-सोलापूर दररोज धावणार आहे. गाडी क्रमांक 71434 सोलापूरहून दररोज सकाळी 10 वाजता सुटून दुपारी 4.25 वाजता दौंडला पोहोचेल. परतीची 71433 ही गाडी दौंडहून सायंकाळी 5.05 वाजता सुटून रात्री 11.35 वाजता सोलापूरला पोहोचेल. या गाडीला मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, केम, जेऊर, केत्तूर आणि भिगवण येथे थांबे असतील. गाडीला 10 डेमू डबे असतील.
विशेष गाडी क्रमांक 01465/01466 आता 71435/71436 या क्रमांकाने सोलापूर-कलबुर्गि -सोलापूर दैनिक पॅसेंजर म्हणून धावणार आहे. 71435 ही गाडी सोलापूरहून दररोज दुपारी 3.10 वाजता सुटून सायंकाळी 5.25 वाजता कलबुरगिला पोहोचेल. तर 71436 ही गाडी कलबुरगिहून रात्री 8.40 वाजता सुटून रात्री 11.20 वाजता सोलापूरला पोहोचेल. हॉटगी, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गाणगापूर रोड हे या गाडीचे प्रमुख थांबे आहेत. या गाडीला 10 डेमू डबे असतील.
दौंड-कलबुर्गि-दौंड मार्गावरील विशेष गाडी क्रमांक 01421/01422 आता 51301/51302 या क्रमांकाने जलद पॅसेंजर म्हणून धावणार आहे. ही गाडी रविवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातील पाच दिवस धावेल. 51301 ही गाडी दौंडहून सकाळी 5 वाजता सुटून कलबुर्गिला सकाळी 11.20 वाजता पोहोचेल. परतीची 51302 ही गाडी कलबुर्गिहून दुपारी 4.10 वाजता सुटून रात्री 10.20 वाजता दौंडला पोहोचेल.
तसेच विशेष गाडी क्रमांक 01125/01126 आता 51303/51304 या क्रमांकाने जलद पॅसेंजर म्हणून धावणार आहे. ही गाडी रविवार आणि गुरुवारी धावेल. 51303 दौंडहून पहाटे 5 वाजता सुटून सकाळी 11.20 वाजता कलबुर्गिला पोहोचेल. तर 51304 कलबुर्गिहून रात्री 8.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 2.30 वाजता दौंडला पोहोचेल. या दोन्ही गाड्यांना बिगवण, केत्तूर, जेऊर, केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, हॉटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर रोड येथे थांबे असतील. गाड्यांना 10 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि 2 द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन असतील.
दरम्यान, मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर विशेष गाडीला नियमित मेल/एक्सप्रेस गाडीचा दर्जा दिला आहे. विशेष गाडी क्रमांक 01435/01436 आता 11303/11304 या क्रमांकाने लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. गाडी क्रमांक 11303 ही १९ ऑगस्ट २०२६ पासून दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दुपारी 12.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 9.15 वाजता सोलापूरला पोहोचेल. तर 11304 ही गाडी १८ ऑगस्ट २०२६ पासून दर मंगळवारी सोलापूरहून सकाळी 9.20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या एक्स्प्रेसला ठाणे, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, मुरुड, लातूर, लातूर रोड, उदगीर, भाल्की, बिदर, हुमनाबाद, ताज सुलतानपूर, कलबुर्गि, गाणगापूर रोड आणि अक्कलकोट रोड येथे थांबे असतील.
या गाडीमध्ये 1 वातानुकूलित (AC) द्वितीय, 1 वातानुकूलित (AC) तृतीय, 11 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन असतील. मध्य रेल्वेने प्रवाशांना गाडी क्रमांकांमध्ये झालेल्या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. गाड्यांच्या सविस्तर वेळा आणि थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर किंवा NTES ॲपवर उपलब्ध आहे. आरक्षित तिकीटांसाठी प्रवासी RailOne ॲपचा वापर करू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.