Hotel Owner Thrashes Manager Naked with Iron Pipe Saam
महाराष्ट्र

नग्न केलं अन् काळंनिळं होईपर्यंत मारलं; हॉटेल मालकाचं मॅनेजरसोबत भयंकर कृत्य, सोलापूर हादरलं

Hotel Owner Thrashes Manager Naked with Iron Pipe: सोलापुरातील हॉटेल मालकाकडून मॅनेजरला मारहाण. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. मॅनेजरकडून घटनेबाबत स्पष्टीकरण.

Bhagyashree Kamble

मॅनेजरने केलेल्या एका चुकीमुळे हॉटेल मालकाने त्यांना नग्न करून मारहाण केलीये. लोखंडी पाईपने त्यांना काळंनिळं होईपर्यंत मारलं. या मारहाणीत हॉटेल मॅनेजर गंभीर जखमी झाले. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ही संतापजनक घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

हा संतापजनक प्रकार टेंभुर्णी येथील हॉटेल ७७ ७७ मध्ये घडला आहे. हॉटेल मालक लखन माने यानं हॉटेल मॅनेजरला मारहाण केली. मॅनेजरच्या एका चुकीमुळे मालकाने सर्व स्टाफसमोर त्यांना मारहाण केली. नग्न करून मारहाण करण्यात आल्याचं व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. हॉटेल मालक अजूनही मोकाट आहे. हॉटेल मालकाला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

व्हायरल व्हिडिओबाबत मॅनेजर म्हणाले, 'दुपारपासून माझा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ खरंतर वेगळ्या पद्धतीने मांडला गेला आहे. हा व्हिडिओ नेमका कुणी काढला? का काढला? हे अद्याप समोर आलेलं नाही. तुम्हाला मॅनेजर या घटनेबाबत अधिक माहिती देतील', असं हॉटेल मालक म्हणाला.

या घटनेबाबत मॅनेजरने सांगितलं की, 'गेल्या अनेक दिवसांपासून मी या हॉटेलमध्ये काम करतोय. ४-५ महिन्यांपूर्वी मी ड्रिंक केली होती. खरंतर मला काहीच सुचत नव्हतं. मला घरचं टेन्शन होतं. मी ड्रिंक करून आलो होतो. म्हणून मला दादांनी शिक्षा दिली होती. दादा फॅमिली मेंबरसारखे आहेत. दादांनी मला कायम मदत केली आहे. हॉटेलचं नाव तसेच दादांचं नाव खराब करण्यासाठी हा कुणीतरी कट रचला आहे', असं मॅनेजरने म्हटलं आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics : बिहारमधील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात वादळ; मुलगी रोहिणी आचार्य यांनी घेतला मोठा निर्णय

Garlic Pickle Recipe: चटपटीत, चमचमीत लसूण लोणचं घरी कसं बनवायचं?

Motichur Ladoo Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असले तर घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी मोतीचूर लाडू

Maharashtra Live News Update: भायखळ्यात इमारत बांधकाम दुर्घटनेदरम्यान दोन मजुरांचा मृत्यू

Ind vs SA 1st Test : भारताचा दक्षिण आफ्रिकेला जोरदार झटका, वर्ल्ड चॅम्पियन संघाचा तिसऱ्या दिवशीच सुपडासाफ करणार

SCROLL FOR NEXT