महाराष्ट्र

Solapur Crime News: दहावीच्या विद्यार्थ्याने मित्राला दिली जीवे मारण्याची धमकी, उकळले तब्बल १० लाख रुपये

10th student threatened to kill his friend: याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे.

Priya More

Solapur News: सोलापूरमध्ये (Solapur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने (10th Student) आपल्या मित्रालाच जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून तब्बल 10 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात या विद्यार्थ्याला त्याच्या नातेवाईकांनी देखील मदत केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Solapur Police) अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमधील एका शाळेमध्ये शिकणाऱ्या नववीतील मुलाचा इयत्ता दहावीत शिकणारा एक मित्र आहे. आपल्या मित्राच्या घरात पैसे असल्याची माहिती दहावीच्या विद्यार्थ्याला मिळाली होती. त्यामुळे लालचेपोटी या विद्यार्थ्याने आपल्या एका नातेवाईकच्या मदतीने आपल्या मित्रालाच जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. आपल्या मुलाचा जीव वाचावा यासाठी नववीच्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी देखील आरोपीने मागितलेली रक्कम दिली. आरोपींनी तब्बल १० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सोलापूरच्या जोडभावी पेठ पोलिसांनी दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. तर त्याचा नातेवाईक आकाश खाडेला अटक केली.

संशयित अल्पवयीन आरोपी आणि फिर्यादीचा मुलगा एकमेकांचे मित्र होते. फिर्यादीच्या घरात 11 लाख 25 हजार रुपयांची रोकडे होती. त्यांचा मुलगा अधूनमधून त्यातील पैसे काढून घेत होता.डिसेंबर 2022 रोजी ठेवलेले कपाटातील पैसे फिर्यादीने एप्रिल 2023 म्हणजेच पाच महिन्यांनी उघडले. त्यावेळी कपाटात अवघे 1 लाख रुपये शिल्लक राहिले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्वासाने मुलाकडे विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीच्या मुलाने संपूर्ण घटना सांगितली.

त्यानंतर विचार विनिमय करून मुलाच्या आईने पोलीस ठाणे गाठले. त्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.याप्रकरणातील आरोपी आकाश खाडेला न्यायालयात हजर करण्यात आले. तर त्याला न्यायालयाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलाला बाल न्यायमंडळासमोर हजार करण्यात आले आहे. पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT