Solapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Solapur Crime News: धक्कादायक! सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वत:वरच झाडली गोळी; आत्महत्येचं कारण काय?

Solapur News: सहाय्यक पोलीस निरीक्षकाची राहत्या घरात आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपवलं जीवन

Ruchika Jadhav

Solapur:

सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलंय. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं असावं याचा पोलीस शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आनंद मळाले असं आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. नांदेड जिल्ह्यात ते कर्तव्यावर असायचे. काही दिवसांपूर्वीच ते सोलापुरातील कुमठा नका परिसरातील त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हलवरने स्वत:वर गोळी झाडून घेतलीये.

सोलापूर पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय.

आनंद मळाले सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. पुढील परीक्षा देऊन त्यांनी काही दिवसांनी वाहतूक शाखा आणि सदर बाजार येथे कर्तव्य पार पाडले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेडमध्ये त्यांची पदोन्नती झाली होती.

मळाले गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांना कामातील कोणत्यातरी गोष्टीचे टेंशन होते. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आनंद मळाळे यांनी आपले जीवन संपवले. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती नातेवाईकांनी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

SCROLL FOR NEXT