Pune Crime News : भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; हातोडीने तरुणांवर हल्ला

Pune News : भरदिवसा पुर्ववैमन्यासातून तरुणाचा खून; हातोडीने तरुणांवर हल्ला
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv

अक्षय बडवे 

पुणे : नातेवाईकांकडे आलेल्या दोन तरुणांवर घराच्या बाहेर पडताच पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून हल्ला करण्यात आला. टोळीकडून हातोडी व स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केल्याने तरुणाच्या डोक्याला जबर मर लागला. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना (Pune) पुण्यात घडली आहे. पुण्यात भरदिवसा घडलेल्या घटनेचा सीसीटिव्ही समोर आला आहे. (Breaking Marathi News)

Pune Crime News
Raigad Crime News: रोहा येथे आदीवासी महिलेची निर्घृण हत्या

बिबेवाडी आणि धनकवडी भागात राहणारे २ तरुण तीन दिवसांपूर्वी पुण्यातील नाना पेठेतील नातेवाईकांकडे आले होते. या दोन्ही तरुणांचे याआधी नाना पेठेतील काही तरुणांशी एकमेकांकडे बघण्यावरुन दीड महिन्यापूर्वी वाद (Crime News) झाले होते. दरम्यान आज हे दोघेही या भागात येत असल्याची माहिती संबंधित तरुणांना मिळाली. त्या भागात राहत असलेल्या तरुणांनी त्यांच्यावर नजर ठेवत ते दोघेही एकत्र जेव्हा नातावाईकांच्या घरातून बाहेर आले. तीच संधी साधत टोळक्याने त्या दोघांवर हातोडी आणि स्क्रीवड्रायवरने हल्ला केला होता. 

Pune Crime News
Nashik Fraud Case: नोकरीला लावून देण्याच्या आमिषाने युवतीची फसवणूक; पाच महिन्यांनी आरोपी ताब्यात

सहा जणांना अटक 

या हल्ल्यात निखील सखाराम आखाडे याच्या मेंदूला जबर मार लागला होता. यात त्याचा बुधवारी मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटिव्ही समोर आला असून या प्रकरणी बंडू आंदेकरसह ६ जणांना अटक तर ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत उर्फ बंडु आण्णा राणोजी आंदेकर, मुलगा कृष्णराज उर्फ कृष्णा सुर्यकांत आंदेकर, तुषार निलंजय वाडेकर, स्वराज निलंजय वाडेकर यांना अटक केली आहे. तर, ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com