Nashik Fraud Case: नोकरीला लावून देण्याच्या आमिषाने युवतीची फसवणूक; पाच महिन्यांनी आरोपी ताब्यात

Nashik News : नोकरीला लावून देण्याच्या आमिषाने युवतीची फसवणूक; पाच महिन्यांनी आरोपी ताब्यात
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीला लावून देतो असे सांगून एका युवतीला सात लाखांचा गंडा (Nashik) घालण्यात आला. युवतीच्या तक्रारीनुसार इंदिरानगर पोलीस (Police) ठाण्यात संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ५ महिन्यानंतर ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

Nashik News
Jalgaon News : धक्कादायक..अभ्यासाच्या ताणातून टोकाचे पाऊल; दहावीतील विद्यार्थ्याचे कृत्य 

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या युवतीला एका इसमाने नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले होते. यातून सदर इसमाने वेळोवेळी पैसे घेत तब्बल सात लाख रुपये घेत (Fraud Case) फसवणूक केली. या प्रकरणी ५ महिन्यापूर्वी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल पाच महिन्यानंतर या व्यक्तीला पकडण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आले आहे. 

Nashik News
Raigad Crime News: रोहा येथे आदीवासी महिलेची निर्घृण हत्या

तीन दिवसांची पोलीस कोठडी 

संशयित विजयकुमार मुंडावरे हा पोलिसांना पाच महिन्यांपासून चकवा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित मुंडावरे याने आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन इंदिरानगर पोलिसांनी केलंय दरम्यान संस्थेचा विरोधात आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com