Solapur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur : हुंडा दिला नाही म्हणून छळ केला, संधी साधून नवऱ्याने आणि सासूने केली नवविवाहितेची हत्या; सोलापूर हादरलं

Solapur Crime News : सोलापुरातील मोहोळमध्ये हुंड्यासाठी २२ वर्षीय नवविवाहितेची गळा दाबून हत्या. पोस्टमार्टम अहवालात खून स्पष्ट; पती आणि सासू अटकेत.

Alisha Khedekar

  • सोलापुरात हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या

  • चार महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

  • पोस्टमार्टममध्ये गळा दाबल्याचे स्पष्ट

  • पती आणि सासू अटकेत

  • परिसरात खळबळ, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Solapur Sonali Shinde Murder case News चार महिन्यांपूर्वी लग्न होऊन सासरी गेलेल्या सोनालीला कधी वाटलं ही नसेल ज्याघरी ती जातेय. त्याच घरचे तिचा जीव घेतील. सोनालीचा सारोळे गावातील प्रतीक शिंदेशी विवाह झाला होता. सुखी संसाराची स्वप्न उरी घेऊन सासरी गेलेल्या सोनालीला वाटलं नसेल की ज्या घराला आपलं म्हणणार आहे, त्याच घरातील व्यक्ती तिच्या जीवावर उठतील. ही धक्कादायक घटना घडली आहे, सोलापुरातील मोहोळ तालुक्यात.

लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून २२ वर्षीय विवाहिता सोनालीची गळा दाबून हत्या झाली. सारोळे गावातील प्रतीक शिंदेसोबत २२ वर्षीय सोनालीचा विवाह झाला होता. पैशाच्या कारणावरून पत्नी आणि सासूकडून सोनालीचा छळ केला जात होता, असा आरोप सोनालीच्या घरच्यांनी केला आहे. याप्रकरणी पती प्रतीक शिंदे, सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे यांच्याविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार महिन्यापूर्वी सोनाली हिचा विवाह प्रतीक शिंदे यांच्यासोबत लावण्यात आला होता. त्यावेळी सासरच्यांनी सोनालीच्या घरच्यांकडून हुंड्याची मागणी केली. त्यानंतरही सोनालीला लग्नानंतर पती आणि सासू यांनी 'लग्नाच्या वेळेस टीव्ही दिला नाही, माझा मानपान करून सोन्याची अंगठी घातली नाही. मी एक दोन आठवड्यात वाट बघेन , नाहीतर तुमची मुलगी परत आणून सोडेन' अशी धमकी दिली होती.

मात्र सोनालीच्या आई-वडिलांनी मुलीच्या काळजीपोटी गयावया करत,'आमची परिस्थिती गरीब आहे' असे सांगून वीस हजार रुपये दिले होते. १२ एप्रिल रोजी सोनालीचे वडील दत्तात्रय सुरवसे यांना पती प्रतीक याचा कॉल आला. त्यावेळेस कॉलवर बोलताना, 'रात्री आम्ही दोघे एकत्र झोपलो होतो, मात्र सोनाली पहाटे उठली नसल्यामुळे आम्ही तिला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात आहोत' असे सांगितले. मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केले.

सोनालीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर तिची गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झालं. याप्रकरणी पती आणि सासू यांना मोहोळ पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सोनालीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT