Solapur Man End Life  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Crime: सोलापूर हादरले! बायकोसाठी ७ मिनिटांचा व्हिडीओ बनवला, नंतर तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवलं

Solapur Man End Life After Domestic Dispute: सोलापूरमध्ये एका तरुणाने बायकोसोबत झालेल्या वादानंतर आत्महत्या केली. राहत्या घरात त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली.

Priya More
  • सोलापूरमध्ये तरुणाची आत्महत्या

  • बायकोसोबत झालेल्या वादानंतर उचलले टोकाचे पाऊल

  • आत्महत्येपूर्वी बायकोसाठी तयार केला ७ मिनिटांचा व्हिडीओ

  • सोलापूरमध्ये एका दिवसांत ३ जणांची आत्महत्या

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सोलापूर हादरले. पहिल्या घटनेत सेंट्रिंगचे काम करणाऱ्या तरुणाने बायकोसाठी ७ मिनिटांचा व्हिडीओ तयार करून नंतर राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत एका तरुणाने अज्ञात कारणावरून आत्महत्या केली. तर तिसऱ्या घटनेत एका सुरक्षारक्षकाने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. या तिन्ही घटनांचे तपास सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाकीर अब्दुल रजाक पटेल (वय ३८ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. तो इंदिरा नगर झोपडपट्टीमध्ये राहत होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी बायकोसाठी ७ मिनिटांचा शेवटचा व्हिडीओ तयार करून नंतर आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

जाकीरने आनंद नगर भाग- १ येथील घरात गळफास घेत आत्महत्या केली. पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, जाकीरचे बायकोसोबत सकाळी भांडण झाले होते. या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्याच्या पश्चात बायको आणि दोन मुलं असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT