Manohar Sapate Saam TV News
महाराष्ट्र

Solapur Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर जबरदस्ती, मध्यरात्री लॉजवर विनयभंग; महिलेनं व्हिडिओ काढत..

Former Mayor Manohar Sapate: सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर दुसऱ्यांदा विनयभंगाचा गुन्हा दाखल. महिलेनं व्हिडिओ पुरावा पोलिसांना दिला असून तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सदस्य आणि सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. दुसऱ्यांदा विनयभंगाचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला आहे. एका ४५ वर्षीय विवाहित महिलेनं त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, महिलेनं पुरावा म्हणून व्हिडिओ पोलिसांकडे सादर केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरूवात केली आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिला पुण्यातील रहिवासी असून, तिचं मूळ गाव उत्तर सोलापूर तालुक्यातील एक गाव असल्याची माहिती आहे. पीडित महिला शेतीविषयक न्यायालयीन प्रकरणासाठी सोलापूरमध्ये येत होती. मुक्कामासाठी ती सपाटे यांच्या लॉजमध्ये राहत होती. १७ जून रोजी रात्री मनोहर सपाटे यांनी तिच्या खोलीत जबरदस्तीने प्रवेश केला. नंतर विनयभंग केला, असं महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

विनयभंग केल्यानंतर पीडित महिलेला सपाटेंनी धमकी दिली. "कुणाला सांगितलं तर परिणाम चांगले होणार नाहीत" अशी धमकी दिल्याची माहिती पीडितेनं दिली. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदाही महिलेवर विनयभंगाचा प्रयत्न झाला. २४ जून रोजी सपाटेंनी महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधित महिलेनं मोबाईल कॅमेरात व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती दिली. तिने हा पुरावा पोलिसांसमोर सादर केला.

या घटनेनंतर पीडित महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठले. महिलेनं पुरावा म्हणून पोलिसांसमोर व्हिडिओ सादर केला. पुराव्याच्या आधारे २५ जूनला फोजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सपाटेंविरोधात गुन्हा दाखल केला.

या अगोदर देखील एका शिक्षिकेने सपाटे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवली होती. त्यामुळे अल्पावधीतच त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीत मनसेच्या प्रमुख शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

Winter Clothing Color: थंडीत कोणत्या रंगाचे कपडे वापरले पाहिजेत आणि का?

SCROLL FOR NEXT