Solapur, Soplaur Police News, Court, Pune, Youth saam tv
महाराष्ट्र

Solapur : अपहरणाची सुपारी घेतली सामाजिक कार्यकर्त्याची अन् उचललं दुस-यालाच; पुण्यातील महिलांची Filmy Style गेम फसली

साेलापूर पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : सोलापूरातील (solapur latest news) युवकाच्या (youth) अपहरणा प्रकरणी न्यायालयाने (court) सात महिला (women) आणि चार पुरुषांना (gents) दाेन दिवसांची पाेलिस काेठडी (police custody) सुनावली आहे. दरम्यान अटकेतील संशयित महिला या पुण्यातील आहेत. त्यांनी एका उद्याेजकाचे अपहरण करण्याची सुपारी घेतली परंतु चुकुन त्यांनी युवकाचे केल्याचे पाेलिस तपासात उघडकीस झाले आहे.

सोलापुरातील रंगभवन चौक परिसरात आकाश काळे (akash kale) या युवकाला दुपारी दोनच्या सुमारास सात महिलांनी दुकानातून मारहाण करत गाडीत घालून पळविले. आकाशच्या मित्राने माेठ्या धैर्याने त्याची अपहरणकर्त्यांकडून सुटका केली. त्यानंतर पाेलिसांनी अपहरणकर्त्यांना अटक केली हाेती. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अपहरणाची सुपारी पुण्यातील एका सात महिला ज्या बाउंसर्स म्हणून काम करतात त्यांनी घेतली हाेती. रणदिवे नामक व्यक्तीची सुपारी त्यांनी घेतली परंतु चुकुन त्यांनी आकाश काळेला उचललं. हा प्रकार गारमेंट व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रणदिवेने गारमेंट व्यवसायातील भ्रष्टाचारची तक्रार केली होती. या विषय वाढू नये म्हणून एका उद्योजकाने मिटवा मिटवीचे खूप प्रयत्न केले होते. मात्र रणदिवे ऐकण्यास तयार नव्हता.

तेंव्हा पुण्यातील एका सुपारी टोळीला रणदिवेची माहिती पुरवण्यात आली. त्याला मारहाण करून उलट त्याच्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील बाउंसर्सची टोळी सोलापुरात दाखल झाली. या महिलांनी रणदिवेवर पाळत ठेवली. बुधवारी दुपारी रणदिवे सात रस्ता परिसरात एका इमारतीत कामानिमित्त गेला. त्यावेळी बाहेर कारमध्ये या महिला त्याची वाट पाहत बसल्या हाेत्या.

दरम्यान योगायोगाने रणदिवे सारखा दिसणारा आकाश काळे या इमारतीमधून बाहेर पडला. त्यालाच रणदिवे समजून या महिलांनी धक्काबुक्की करत गाडीत ढकलले आणि तिथून या आपहरानाचे नाट्या घडले. मात्र आकाशचे सोलापुरी मित्र खमके निघाल्यामुळे लेडी टोळीचा डाव फसला.

पोलिसांनी महिलांना अटक करून चौकशी सुरु केली तेंव्हा हळूहळू खरा प्रकार समोर येत आहे. हा सर्व प्रकार समजल्यानंतर आकाश काळेच टेन्शन कमी झालं असलं तरी रणदिवेचे वाढलं आहे. या प्रकरणी 7 महिला आणि 4 पुरुषांना पोलिसांनी अटक केलीय. सोलापूर न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील पोलीस तपासणीत आणखी काय धागेदोरे हाती लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT