Solapur Rain Saam Tv News
महाराष्ट्र

Solapur News : सोलापुरात अवकाळी! अनेकांच्या घरात पाणी, जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान

Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावात जोरदार पाऊस झाला आहे. अनेकांच्या घरात तर पाणी शिरलंय.

Prashant Patil

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी गावात जोरदार पाऊस झाला आहे. अनेकांच्या घरात तर पाणी शिरलंय. त्याचदरम्यान, वर्धा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. वर्ध्याच्या पूलगावसह इतर भागात जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकाचं नुकसान झालं आहे. अचानक पाऊस आल्यानं व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

पावसाच्या आगमनाने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मिळाला काहीसा दिलासा मिळाला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. रात्रीपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. वातावरणातील बदलामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. जिल्ह्यातील राहाता, राहुरी, श्रीरामपूर तालुक्यांसह सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु आहे. अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने रस्ते जलमय झाले आहेत. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. फळ पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मागच्या तीन ते चार दिवसापासून रोज वादळी वारा आणि अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक उदगीर तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं आणि विशेषत: आंबा फळबागदारांचं मोठं नुकसान झालं आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे उदगीर तालुक्यातल्या हंगरगा शिवारातील पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून गेल्यानं सुमारे ६०० ते ७०० कोंबड्यांचा मृत्यू झालाय. तर बामणी शिवारात वीज पडून तीन जनावरं आणि २४ मेंढ्या दगावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT